Coronavirus News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी झाले ‘कोरोना’ संक्रमित, स्वतः झाले ‘आयसोलेट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती स्वत: नितीन गडकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. नितीन गडकरी यांनी स्वत: ला आयसोलेट केलं आहे.

काल मला अशक्त पणा जाणवल्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासणी दरम्यान कोरोना बाधा झाल्याचे समोर आले आहे. सध्या आपणा सर्वांच्या शुभेच्छामुळे माझी प्रकृती ठीक असून मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. अशी माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने 11 लाखाचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासात 23 हजार 265 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 11 लाख 21 हजार 221 वर पोहचली आहे. राज्यात 474 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 30 हजार 883 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 2.75 टक्के आहे.