Union Minister Nitin Gadkari |  केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, नागपुरातील निवासस्थानी सुरक्षा वाढवली; राजकीय वर्तुळात खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन (Threat phone call) आला आहे. सोमवारी (दि.15) नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांना जिवे मारण्याची धमकीचा (Death Threat) फोन आला. याबाबत त्यांच्या कार्यालयाने दिल्ली पोलिसांना (Delhi Police) माहिती दिली. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांना दिल्लीतील निवासस्थानी अज्ञात आरोपीने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) सावध पवित्रा घेत गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी आणि त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. गडकरी यांच्या निवासस्थानी बॉम्ब शोधक नाशक पथक (Bomb Disposal Squad) तसेच सशस्त्र कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

नितीन गडकरी यांना यापूर्वी कर्नाटक मधील बेळगाव जिल्हा कारागृहातील (Belgaum District Jail) जन्मठेपेचा (Life Imprisonment) आरोपी जयेश पुजारी (Jayesh Pujari) याने 100 कोटी रुपयांची खंडणी (Ransom) मागून बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी पुजाली याला अटक करुन त्याच्यावर विविध कलमांतर्गत कारवाई केली आहे. सध्या तो एनआयए (NIA) च्या ताब्यात आहे.

 

आरोपी जयेश पुजारी याचे दहशतवादी संघटनाशी (Terrorist Organizations) संबंध आहेत.
तो सध्या एनआयए पथकाच्या ताब्यात आहे. मात्र,
एकीकडे नितीन गडकरी यांना धमकी देणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना पुन्हा जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला आहे.
त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

Web Title : Union Minister nitin gadkari receives threat call at delhi residence security tightened

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा