गडकरींनी अधिकाऱ्यांना ‘ठणकावले’, काम करा नाहीतर नागरिकांना सांगून ‘धूलाई’ करू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागपुरात आयोजित राष्ट्रीय अधिवेशनाच्या एका लघु उद्योग कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत सांगितले की, आठ दिवसांत दिलेलं काम पूर्ण करा नाहीतर, लोकांना कायदा हातात घ्यायला सांगून धुलाई करायला लावेल. यादरम्यान त्यांनी लालफीतशाही बद्दल नाराजीही व्यक्त केली.

एमएसएमई सेक्टर मध्ये काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) शी निगडित लघु उद्योग भरती कार्यक्रमात नितीन गडकरी सांगत होते कि, त्यांनी अधिकाऱ्यांना काही सुचला दिल्या आहेत, कि काही गोष्टी जर लवकर सुटत नसतील तर, ते लोकांना सांगितलं कि ह्यांना चोप द्या. गडकरी पुढे म्हणतात कि, “आपल्याकडे ही लालफीतशाही का आहे ?, हे उपनिरीक्षक का येतात ?, लाच घेतात, मी त्यांच्या तोंडावर सांगेल कि, ते सरकारी नोकर आहेत, मी लोकांद्वारा निवडून दिलेला प्रतिनिधी आहे, मी लोकांप्रती जबाबदार आहे, जर तुम्ही चोरी करत आहेत तर, तुम्ही चोर आहात.”

नितीन गडकरी म्हणाले कि,”आज मी एका आरटीओ च्या बैठकीत गेलो होतो, जिथे निदेशक आणि परिवहन आयुक्त हे देखील उपस्थित होते, मी त्यांना सांगितले कि आठ दिवसांच्या आत ह्या अडचणींनाच निकाल लावा, नाहीतर तर मी लोकांना कायदा हातात घ्यायला लावून तुमची धुलाई करण्यास सांगेल,” ते पुढे म्हणाले कि मला माझ्या शिक्षकांनी शिकवले आहे कि, अश्या सिस्टीम ला बाहेर फेक जी काम करत नाही.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिवेशनात सहभागी होणाऱ्या सर्वांशी मोकळेपणाने संवाद साधला आहे. त्यांनी व्यवसायाचा विस्तार करण्यास सांगितले, तसेच त्यांनी सांगितले कि अधिकारी व्यापारकर्त्यांना त्रास देऊ शकत नाही.

आरोग्यविषयक वृत्त –