RBI चा ‘हा’ गव्हर्नर चांगला नाही, तात्काळ बडतर्फ करा ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा ‘गौप्यस्फोट’

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन – ‘हा गव्हर्नर चांगला नाही. त्याला तात्काळ बडतर्फ केले पाहिजे’, असे आपण वित्तमंत्र्यांना सांगितले होते असे वक्तव्य केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. बडतर्फ करण्यात यावे असे सांगीतलेली व्यक्ती रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर पदी कार्यरत होती. रविवारी नागपूरमधील समारंभात बोलताना गडकरी यांनी हे विधान केले आहे विशेष म्हणजे या वेळी गडकरी यांनी दोन समारंभाला हजेरी लावली होती आणि दोन्ही समारंभात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर किती आडव्यात भूमिका घेतात हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित अधिकाऱ्याचे नाव मात्र त्यांनी सांगितले नाही.

गव्हर्नरांचे मन वळविण्याचा मी खूप प्रयत्न केला. परंतु, ते अडून राहिले. नंतर वित्तमंत्र्यांनी मला सांगितले की, गव्हर्नरांनी राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. त्यावर मी वित्तमंत्र्यांना सांगितले की, ते स्वत: जाणार नसतील तर त्यांना हाकलून लावणे योग्य राहील. ते चांगले नाहीत, असे गडकरी यावेळी बोलताना म्हणाले.

रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडून बँकिंग क्षेत्र सकारात्मक भूमिकेची अपेक्षा करू शकते, असेही गडकरी म्हणाले. रालोआच्या पहिल्या कार्यकाळात अरुण जेटली आणि पीयूष गोयल हे वित्तमंत्री होते. त्या काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद रघुराम राजन आणि ऊर्जित पटेल यांनी सांभाळले, असे असले तरी नितीन गडकरी यांनी गव्हर्नरचे आणि वित्तमंत्र्यांचे थेट नाव घेऊन बोलणे टाळले.

आरोग्यविषयक वृत्त