Union Minister Piyush Goyal | ‘ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात’, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे (Shinde Group) आणि ठाकरे गटातील (Thackeray Group) नेत्यांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. यातच ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांनी एका मुलाखतीत गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटाचे दोन खासदार (MP) त्यांची साथ सोडण्याच्या तयारी आहेत. असं पीयूष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांनी सांगितले. गोयल यांच्या वक्तव्यामुळे ते दोन खासदार कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटातील दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याची माहिती दिली आहे.

शिंदे-फडणवीस याचे चांगले सरकार

ते म्हणाले, महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस याचे चांगले सरकार (Shinde-Fadnavis Government) आहे. ठाकरे यांनी त्यांच्या सरकारच्या काळात प्रलंबित ठेवलेले प्रकल्प आताच्या सरकारने मार्गी लावले आहेत. शिवसेना आमच्यासोबत आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपल्या पक्षाची साथ सोडली, यासाठी आम्ही जबाबदार नही, असेही गोयल यांनी सांगितले.

दोन खासदार आमच्या संपर्कात

गोयल पुढे म्हणाले, काही मोजके खासदार सोडले तर बाकीचे आमच्या सोबत आहेत.
आणखी दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत, अशी माहिती मला मिळाली आहे.
विधिमंडळात तर हम दो हमारे दोन असेच राहतील.
फक्त अडनाव वापरून चालत नाही, आता घराणेशाही चालणार नाही, असा टोला गोयल यांनी लगावला.

नरेंद्र मोदी नंबर वन हिरो

उद्धव ठाकरे यांच्यासह राहुल गांधींवर (Rahul Gandhi) निशाणा साधताना गोयल म्हणाले,
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नंबर वन हिरो आहेत, असं म्हणत त्यांनी मोदींचे कौतुक केले.
मोदींच्या नेतृत्वात आपण 2047 पर्यंत विकासाचा मोठा टप्पा गाठू, अशी आशा पीयूष गोयल यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title :- Union Minister Piyush Goyal | union minister piyush goyal said 2 more mp of uddhav thackeray party will joined our party rising india summit 2023

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

AFINDEX-23 | भारत- आफ्रिका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव, AFINDEX-23 चा पुण्यात समारोप

Devendra Fadnavis On Girish Bapat | जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले! खा. गिरीश बापट यांना देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

MP Girish Bapat Passed Away | भाजप खासदार गिरीश बापटांच्या निधनानं राष्ट्रवादीच्या नेत्याला अश्रू अनावर, सांगितल्या जुन्या आठवणी