शेतकऱ्यांचा संघर्ष ‘नाटकी’ : केंद्रिय कृषीमंत्री राधामोहन सिंह

पाटणा : पोलिसनामा ऑनलाइन

देशभरात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या पुर्ण करण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. त्यावर सरकारने उपाय शोधण्याचे दुरच राहीले उलट, त्यांचा संघर्ष ‘नाटकी’ आहे, शेतकरी आंदोलन म्हणजे ‘पब्लिसिटी स्टंट’ आहे. असे वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केले आहे.

शेतकरी आंदोलनाबाबत पाटणा येथील कार्यक्रमात केंद्रिय कृषिमंत्री राधामोहन सिंहाना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्ननांची उत्तरे देताना म्हणाले की, माध्यमांमध्ये झळकण्यासाठी असं काहीतरी करावं लागतं. देशभरात बारा ते चौदा कोटी शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकरी संघटनेत ५०० ते १००० शेतकरी असतील आणि त्यांना माध्यमांमध्ये झळकण्यासाठी काही तरी करावं लागतं, असं ते म्हणाले.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी सरकारमधील नेते असे बेजबाबदार वक्तव्य करताना दिसुन येत आहे. याआधी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही आंदोलनाविषयी बेताल वक्तव्य केलं होतं. उगाच कोणत्याही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून शेतकरी स्वतःचं नुकसान करून घेत आहेत, असं ते म्हणाले होते.