Union Minister Rajnath Singh | ‘आम्ही कोणाला छेडणार नाही, कोणी आम्हाला छेडले तर सोडणार नाही’ – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Union Minister Rajnath Singh | भाजप नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Union Minister Rajnath Singh) काल (शुक्रवारी) पुणे (Pune News) दौऱ्यावर होते. भाजपच्या (BJP) वतीने भाजप शहर पदाधिकाऱ्यांशी राजनाथ सिंह यांनी संवाद साधला आहे. ‘भारत पूर्णपणे सुरक्षित आहे. जगातील कोणतीच ताकद भारताकडे डोळे वर करून पाहू शकत नाही. आम्ही कोणाला छेडणार नाही. मात्र कोणी आम्हाला छेडले तर सोडणार नाही,’ असा इशाराच मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे.

 

”पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) कामांमुळे मागील 5 वर्षात देश आर्थिक श्रेणीत अग्रेसर असल्याचं, ” राजनाथ सिंह (Union Minister Rajnath Singh) यांनी सांगितलं आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, ”संघटन ही भाजपची शक्ती आहे. सरकार स्थापन करण्यासाठी भाजप राजकारण करत नाही. तर देश तयार करण्यासाठी भाजप राजकारण करत आहे. भाजप हा देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, याची जाणीव पदाधिकाऱ्यांनी ठेवावी. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची जबाबदारी मोठी आहे. समाजाप्रती आणि देशाप्रती असलेली जबाबदारी विसरू नका,” असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.

पुढे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, ”कोरोना महामारीत मोदी सरकारने (Modi Government) अर्थव्यवस्था कोसळू दिली नाही.
त्यामुळे महागाईवर नियंत्रण आहे. युक्रेन – रशिया युध्दामुळे (Ukraine – Russia War) काही प्रमाणात महागाई वाढलीय.
या युद्धाचा परिणाम अनेक देशांवर झाला आहे. अमेरिकेमध्ये देखील प्रचंड महागाई झाली आहे.
त्याचे परिणाम देशातही दिसणे सहाजिक आहे. त्यातुलनेमध्ये भारतातील परिस्थिती चांगली आहे,” असं ते म्हणाले.
भाजपच्या मेळाव्यादरम्यान भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik),
खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat), आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole),
सुनील कांबळे (Sunil Kamble), माजी मंत्री दिलीप कांबळे (Dilip Kamble) यांच्यासह भाजप युवा पदाधिकारी (BJP Youth Office Bearers) यावेळी उपस्थित होते.

 

 

Web Title :- Union Minister Rajnath Singh | someone teases us we will not leave defense minister rajnath singh warning in pune news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा