रामदास आठवलेंचा दावा, ‘कोरोना’ वॅक्सीनबाबत देखील दिले संकेत

पोलिसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आता कोरोना व्हॅक्सिनची (Corona Vaccine) सगळ्यांना प्रतिक्षा आहे. या पार्श्वभूमीवर, रामदास आठवले यांनी दावा केला आहे की, COVID-19 व्हॅक्सिन पुढील एक-दो महिन्यात देशात उपलब्ध होईल. दरम्यानच्या काळात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) विरोधात ‘गो कोरोना गो’ (Corona Go Go Corona) अशी घोषणा दिली होती. या घोषणेने सोशल मीडियात अक्षरश: धुमाकूळ घातला होता.

आपल्या हटके वक्तव्यामुळे रामदास आठवले हे नेहमी चर्चेत राहिले आहेत. देशभरात कोरोना विषाणूचं संक्रमण झाले तेव्हा ‘गो कोरोना गो’ असा मंत्र देऊन रामदास आठवले ते चर्चेत आले होते. यावेळी, रामदास आठवले म्हणाले, ‘मी २० फेब्रुवारीला ‘गो कोरोना गो’ची नारा दिला होता आणि देशभरातील कोरोनाचा प्रसार कमी झाला. कोरोनाबाधित रुग्ण बरे होत आहेत. कोरोना पुढील ६-७ महिने राहिल. नंतर मात्र त्याला हद्दपार व्हावंच लागेल.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ‘ सोशल मीडियावर ‘गो कोरोना गो’ हा त्यांचा नारा प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आठवले यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांची प्रकृती देखीव ठणठणीत होती. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून आठवले होम क्वारंटाईन झाले होते. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. नंतर ते चार दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. अवघ्या काही दिवसांतच त्यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र, ‘ सोशल मीडियावरील ‘गो कोरोना गो’ लोकांच्या आजही लक्षात आहे.