केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा कोरोना (Coronavirus) अहवाल पॉझिटिव्ह (positive) आल्यानंतर रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (union minister ramdas athawale) यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रामदास आठवले यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

रामदास आठवले यांना काल लक्षणं जाणवत असल्यानं कोरोनाची चाचणी करुन घेतली होती. आज त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच, आठवले यांच्या संपर्कात आलेल्या इतर कार्यकर्त्यांनीही कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.

दरम्यान, रामदास आठवले यांनी काल अभिनेत्री पायल घोषला रिपाइं पक्षात प्रवेश दिला होता. त्यावेळी रामदास आठवले तिथे उपस्थित होते. तसेच, पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान अनेक कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. त्यामुळे खबरदारचा उपाय म्हणून पक्षाकडून आठवलेंच्या संपर्कात आलेल्या व लक्षण जाणवत असणाऱ्यांना कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, अशी सूचना देण्यात आल्या आहेत.