‘हा’ तर अमेठीतील लोकांचा अपमान : स्मृती इराणी

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. आज केरळमध्ये त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. यावेळी प्रियांका गांधी देखील उपस्थित होत्या. त्यावरून आता अमेठी येथील भाजपच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘ १५ वर्षे खासदार असणाऱ्या राहुल गांधी यांनी आमेठीसाठी कोणतीही विकासकामे केली नाहीत. राहुल गांधी आता वायनडमधून निवडणूक लढवत आहेत. हा तर अमेठीच्या लोकांचा अपमान आहे,तो आता सहन केला जाणार नाही ‘ असा टोला स्मृती इराणी यांनी लगावला आहे.

खरतर अमेठी म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. अमेठीत भाजपकडून स्मृती इराणी आणि काँग्रेसकडून अध्यक्ष राहुल गांधी निवडणुकीच्या मैदानात आहेत. राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहाखातर राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून लोकसभेच्‍या मैदानात उतरले आहेत. अशी चर्चा आहे.  वायनाडमधून भारत धर्म जनसेनाचे अध्यक्ष तुषार वेल्लापल्ली यांनी राहुल गांधी यांना आव्हान दिले आहे.

२०१४ मध्ये देखील स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना अमेठीतून आव्हान दिले होते. पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता पुन्हा एकादा २०१४ प्रमाणेच चुरस पाहायला मिळणार आहे.

You might also like