या’ केंद्रीय मंत्र्यांचा #Me Too ला पाठिंबा

नवी दिल्ली – वृत्तसंस्था

सध्या #MeToo या चळवळीने चांगलाच जोर धरला आहे. अनेक जणांनी या चळवळीला पाठिंबा दर्शवला आहे तर अनेकांनी यावर शंका व्यक्त केली आहे. मात्र, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी या #Me Too चळवळीवर आपली प्रतिक्रिया दिली असून याला आपला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. महिला कामाच्या ठिकाणी शोषण होण्यासाठी जात नाहीत. तर स्वत:चे स्वप्न, आकांक्षा पूर्ण करुन स्वतंत्र ओळख बनवण्यासाठी जातात. त्यामुळे ज्या महिलांनी त्यांच्यावर झालेल्या गैरवर्तनाविरुद्ध आवाज उठवलेला आहे, त्यांना न्याय मिळेल अशी मला आशा आहे, असे स्मृती इराणी म्हणाल्या.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5143562e-cd5d-11e8-b07f-5de49ec78d74′]

परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांबाबत त्या म्हणाल्या की, याप्रकरणावर संबंधित व्यक्तींनी बोलणेच संयुक्तिक ठरेल. मात्र, माध्यमात काम करणाऱ्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची दखल सोशल मीडियातून घेतली जात आहे, याला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचेही स्मृती इराणी यांनी सांगितले.

या चळवळीच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध व्यक्त होणाऱ्या महिलांनाच दोषी ठरवणे किंवा त्यांची हेटाळणी करणाऱ्याच्या मी ठाम विरोधात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याउलट लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’58fabca0-cd5d-11e8-8f62-c34d93d6d0cb’]

केंद्रीय मंत्री अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप
केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांच्यावर प्रिया रमानी नावाच्या महिला पत्रकाराने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. #MeToo ही चळवळ सुरू झाल्यापासून याप्रकारे अनेक मनोरंजन आणि माध्यम जगतातील व्यक्तींची नावे समोर येत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार अकबर यांनी अनेक वृत्तपत्रांचे संपादक पद भूषवले आहे. अकबर यांनी एका हॉटेलमध्ये बोलावून मुलाखत घेण्याच्या बहाण्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले होते, असा आरोप महिलेने केला आहे.