JNU वाद : स्मृति इराणींचा दीपिकावर ‘निशाणा’, म्हणाल्या – ‘ज्यांना देशाचे तुकडे करायचेत, ती त्यांच्यासोबत उभी राहिली’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या जेएनयूमध्ये जाण्यावरुन सुरु झालेला वाद शमण्याचे नाव घेत नाहीये. आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दीपिका पादुकोणवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की तिने हे सांगितले पाहिजे की अखेर तिची राजकीय विचारधारा काय आहे हे तिने स्पष्ट करावे. इराणी यावेळी एका कार्यक्रमात बोलत होत्या.

काय आहे राजकीय विचारधारा –
स्मृती इराणी म्हणाल्या की मी हे जाणून घेऊ इच्छिते की तिची राजकीय विचारधारा काय आहे. ज्यांनी कोणी हे वृत्त वाचले त्यांना माहित आहे की ती तेथे कशासाठी गेली. आमच्यासाठी ही आश्चर्याची बाब नाही की ती त्या लोकांसह उभी राहिली जे भारताच्या नुकसान व्हावे असा विचार करतात. ती त्यांच्यासोबत उभी होती ज्यांनी काठ्यांनी मुलींच्या प्रायवेट पार्टवर हल्ला केला. मी तिचा हा आधिकार काढून घेऊ शकत नाही.

स्मृती इराणी यांनी आरोप केला की, दीपिका काँग्रेसशी जोडली गेलेली आहे. त्या म्हणाल्या की दीपिकाने 2011 सालीच सांगितले होती की ती काँग्रेस पक्षाचे समर्थन करते. जर लोक आश्चर्य आहे तर यासाठी आहे कारण त्यांना याबाबत माहित नाही. तिच्या अनेक चाहत्यांना देखील हे आता आता माहित झाले आहे.

हल्ल्यावर नो कमेंट्स –
जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर बुरखाधाऱ्यांनी हल्ला केला यावर विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की या प्रकरणाचा तपास अजून सुरु आहे, त्यामुळे मी यावर बोलणार नाही. त्या म्हणाल्या की मी एवढेच सांगेल की मी घटनात्मक पदावर आहे आणि पोलीस तपासानंतर जेव्हा घटनेचा पक्ष न्यायायलयात मांडण्यात येत नाही तो पर्यंत यावर भाष्य करणे योग्य नाही.

का सुरु आहे वाद –
7 जानेवारीला बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने जेएनयूमध्ये जाऊन आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. या दरम्यान ती जखमी झालेल्या जेएनयू छात्रसंघाच्या आयशी घोष हिला देखील भेटली. परंतु यामुळे ट्विटरवर लोकांनी दीपिकावर टीका केली. अनेकांनी तर तिच्या छपाक या सिनेमाला विरोध केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/