केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या ‘त्या’ पोस्टवर एकत्र आलं ‘सास-बहू परिवार’ ! शेअर केला ‘व्हिडीओ’

पोलिसनामा ऑनलाइन –गेल्या अनेक दशकांपासून टीव्हीची क्वीन एकता कपूर प्रेक्षकांसाठी अनेक मजेदार मालिका घेऊन येत आहे. एक जमाना होत सासू सुनेच्या मालिकांचा. महिला व बालविकास मंत्री तसेच टेक्स्टाईल मंत्री आणि एक अभिनेत्री असलेल्या स्मृती इराणी यांनी एक जुना शेअर केला आहे जे पाहून साऱ्यांचे डोळे भरून येतील.

एकता कपूरची मालिका क्योंकि सास भी कभू बहू थी या मालिकेत स्मृती इराणी यांनी आदर्शन सून तुलसी वीरानीची भूमिका साकारली होती. हा शो लोकांना एवढा आवडतो की, आजही तो शो लोकांच्या स्मरणात आहे आणि त्यांचा फेवरेट आहे. जुन्या दिवसांची आठवण काढत स्मृती इराणी यांनी स्टार परिवार अवॉर्डसाठी बनवलेला एक व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओ शेअर करताना स्मृची इराणींनी लिहिलं की, “ते वर्ष होतं 2004. राजकारणाच्या वाटेवर चालण्याआधी मला वाटलं की, माझं आणखी एक कुटुंब आहे जे रात्री 10.30 वाजता माझ्या घरी येण्याची आतुरतेनं वाट पहात असतं. जरी काल्पनिक असलं तर ते आपलं होतं. माझ्या सर्वांत सुंदर आठवणी त्यांच्यासोबत जोडल्या गेल्या आहेत जे मला दुवा देतात, माझ्यावर प्रेम करतात आणि टीव्हीच्या स्क्रीनद्वारे माझ्याशी जोडले गेले होते.”

अशी होती स्टार्सची रिअॅक्शन

या पोस्टमध्ये इराणी यांनी एकता कपूर, रोनित रॉय, करिश्मा तन्ना, हितेन तेजवानी, हुसैन, जुही परमार, संगीता, किरण कर्मकार, श्वेता तिवारी असं साऱ्यांना टॅग केलं आहे. या कलाकारांनीही या पोस्टवर कमेंट करत आठवणींना उजाळा दिला आहे.