Unique Digital Address Code | लवकरच घराचा पत्ता म्हणून वापरता येईल QR कोड, जाणून घ्या ‘स्कीम’

0
111
Unique Digital Address Code | Modi government is bringing unique digital address code in place of pin code know how it works here in Marathi News
File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारत सरकारचा (Government of India) पोस्ट विभाग देशात डिजिटल एड्रेस कोड (Unique Digital Address Code) तयार करण्याच्या प्रक्रियेवर काम करत आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन डिलिव्हरी बुक करण्यासाठी किंवा मालमत्ता कर (Property tax) भरण्यासाठी त्यांचा पत्ता देण्याची आवश्यकता राहणार नाही. याचा आगामी काळात ऑनलाइन डिलिव्हरीसह अनेक प्रकारच्या सुविधांसाठी डिजिटल एड्रेस कोडचा (Unique Digital Address Code) उपयोग होणार आहे.

 

सध्या कुरिअर आणि डिलिव्हरी बॉयला अचूक पत्ता माहिती असून देखील बऱ्याचदा तुमचे पार्सल योग्य ठिकाणी पोहोचवता येत नाही. या कामात गुगल मॅपचीही (Google Map) मदत होत नाही. परंतु लवकरच सरकारकडून देशातील प्रत्येक नागरिकासाठी एक युनिक कोड (Unique code) उपलब्ध करुन दिला जाणार आहे. हा कोड टाईप करुन किंवा क्युआर कोडप्रमाणे (QR code) स्कॅन करुन, तुम्हाला घराचे अचूक लोकेशन मिळेल. अशाप्रकारे, तुमची अनेक कामे पत्ता न भरता देखील या कोडच्या मदतीने पूर्ण होतील. या कोडमध्ये डिजिटल मॅप देखील पाहता येतील. (Unique Digital Address Code)

 

डिजिटल एड्रेस कोड (DAC) कसा बनवायचा?

 

सध्या भारतामध्ये 75 कोटी घरे असून या घरांसाठी एक डिजिटल युनिक कोड (Digital Address Code) तयार केला जाणार आहे. DAC प्रत्येक पत्त्यासाठी डिजिटल ऑथेंटिकेशन करण्यात येईल. डिजिटल अॅड्रेस कोड तयार करण्यासाठी देशातील प्रत्येक घराची यूनिक आयडेंटीफिकेशन केले जाणार आहे. पत्ता जियोस्पेशियल कोऑर्डिनेट्सशी (geospatial coordinates) जोडला जाईल. जेणेकरुन प्रत्येकाचा पत्ता हा रस्ता किंवा गल्ली नाही तर संख्या आणि अक्षरे असलेल्या कोडद्वारे ओळखला जाईल. हा कोड कायमस्वरुपी असणार आहे.

 

काय होईल फायदा

 

  • प्रत्येक घराचा पत्ता ऑनलाइन व्हेरिफीय केला जाऊ शकेल. बँकिंग, विमा, टेलिकॉमचे ई-केवायसी (E-KYC) सोप्या पद्धतीने केले जाईल.
  • ई-कॉमर्स सारख्या सेवेसाठी DAC अत्यंत उपयुक्त ठरु शकते.
  • सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी DAC खूप मदत करेल. तसेच फसवणुकीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल.
  • कर आकारणी, मालमत्ता, जनगणना, आपत्ती व्यवस्थापन आणि लोकसंख्या नोंदी तयार करण्यास मदत होईल.
  • DAC वन नेश वन अ‍ॅड्रेसचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करेल.

 

Web Title : Unique Digital Address Code | Modi government is bringing unique digital address code in place of pin code know how it works here in Marathi News

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Update | कोविडच्या नवीन व्हेरिएंटमुळे सोन्याच्या किमतीत उसळी, Gold खरेदी करणे महाग ठरू शकते का?

SBI Credit Card ग्राहकांसाठी वाईट परंतु महत्वाची बातमी, जाणून घेतले तर होईल फायदा

Nagpur Crime | धक्कादायक ! नागपूरमध्ये महिला डॉक्टरची निर्घृणपणे हत्या