अंत्ययात्रेत ‘राम नाम सत्य’ ऐवजी ‘चेअरमन मुडदाबाद’च्या घोषणा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विविध मागण्यासाठी वेगवगळ्या पद्धतीने आंदोलन केले जाते. आंदोलन करून आपल्या मागण्या संबंधीत व्यक्तीपर्यंत पोहचवल्या जातात. मात्र, दिल्लीतील सहरनपूरमध्ये वेगळेच चित्र पहायला मिळाले. रस्ता खोदून भूमीगत विद्यूत वायरीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्ता पुन्हा दुरुस्त न केल्याने सहारनपूर येथील दलीत नागरिकांनी चेअरमनविरुद्ध अनोखे आंदोलन केले. वस्ती मधील एका मुलाचे निधन झाले होते. त्यावेळी त्याला स्मशानभुमीत नेत असताना गावकऱ्यांनी ‘राम नाम सत्य’ ऐवजी ‘चेअरमन मुडदाबाद’च्या घोषणा दिल्या.

हा प्रकार जनपद शामली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दलित वस्तीमधील आहे. या वस्तीमध्ये मृत व्यक्तीच्या दफनासाठी आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दिल्ली-सहरनपुर महामार्गावरील एका कंपनीच्या मागे असलेल्या नदी किनारी जागा देण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी मृतदेह घेऊन जाण्यासाठी नागरिकांना रस्ता नव्हता. नागरिकांनी अनेक प्रयत्नातून या ठिकाणी रस्ता तयार करून घेतला होता. मात्र, विद्युत विभागाच्या ठेकेदाराने या ठिकाणच्या चेअरमनचा पती अजीजच्या मदतीने हा रस्ता खोदून भूमिगत वायर टाकली. काम झाल्यानंतर ठेकेदाराने रस्ता दुरुस्त केला नाही. या कामासाठी चेअरमनच्या पतीने लाखो रुपये घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
Dalit-society
बुधवारी दलित समाजातील रनवीर दीवान यांचा मुलगा धनपत याचे निधन झाले होते. त्याच्या अंत्यविधीसाठी लागणारे लाकडं स्मशानभूमीत एका ट्रॅक्टरमधून घेऊन जात होते. रस्ता खराब झाल्याने या ठिकाणी ट्रॅक्टरचे चाक फसले. नागरिकांनी अनेक प्रयत्नातून फसलेला ट्रॅक्टर काढला. त्यामुळे नागरिक संतापले होते. दरम्यान, मृतदेह स्मशानभूमित नेत असताना रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे आणि चिखलामुळे नागरिकांना मृतदेह नेण्यास अडचणी येत होत्या. त्यावेळी संतापलेल्या नागरिकांनी राम नाम सत्य ऐवजी चेअरमन मुडदाबाच्या घोषणा देऊन आपला संताप व्यक्त केला.

Dalit-society

Dalit-society

आरोग्यविषयक वृत्त –