एचआयव्ही पॉझिटिव्ह महिला व अंध-अपंगास प्रोत्साहन देणारे भीमथडीमधिल अनोखे स्टॉल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ असावी, बचत गटातील महिलांना आत्मनिर्भर होता यावे, उद्योग क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी महिलांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, असा उदात्त हेतू असणाऱ्या भीमथडीने १३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. विविध संंकल्पनांनी नटलेल्या अनोख्या स्टॉल्सला यावर्षी देखील पुणेकरांकडून प्रचंड प्रेम मिळाले, यातील २ अनोख्या  स्टॉल्सने यावेळी पुणेकरांचे विशेष लक्ष आकर्षित केले.

१७ जुन २०१९ पासुन कार्यरत असणाऱ्या क्षितिज दिव्यांग विरंगुळा पुनर्वसन केंद्राने गेल्या तीन वर्षांपासून अंधजनांना रोजगार मिळावा आणि संस्था स्वयंपूर्ण होउन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करता यावे या उद्येशाने संस्थेची स्थापना केली आहे. वेस्ट मधून बेस्ट उपक्रमाअंतर्गत अंध-अपंग लोकांद्वारे बनविल्या वस्तू विकणारा हा स्टॉल भीमथडी सिलेक्ट मधे पहावयास मिळेल. मजुश्री कुलकर्णी यांना १२ वर्षापुर्वीया संस्थेची सुरुवात केली होती. चॉकलेट, हॅन्डमेड, ज्वेलरी, गुहसजावटीच्या वस्तू, बॅग्ज पिशव्या, खास विदर्भातील चटण्या आणि वेस्ट मधून बेस्ट प्रोडक्ट आदि सर्व या स्टॉलवरती पहावयास मिळेल.भीमथडीमध्ये लोकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

दूसरा स्टॉल म्हणजे मदर क्विल्ट्स, एचआयव्ही पॉझिटिव्ह व गरजू महिलांना आर्थिक लाभ मिळावा ह्या उद्येश्याने मदर क्विल्ट्सची सुरुवात झाली, इरकल गोधडी, बाळाची दूपटी हॅडलूम आणि रिसायकल संकल्पना असणारे विविध वस्त्रप्रकार या  स्टॉलवर पहावयास मिळाले, संस्थेचे संस्थापक निरज बोराटे आणि तुषार पाखरे यांनी २०१४ मध्ये मदर क्विल्ट्सची सुरुवात केली होती निरज बोराटे म्हणतात कि, आज ९ वेगवेगळ्या देशामध्ये आणि भारतात देखील खुप मोठ्या प्रमाणात आमच्या वस्तूंना मागणी आहे. आम्ही एचआईव्ही पॉजीटिव्ह आणि गरजू महिलांना प्रोत्साहित करतो, कारण आपल्या समाजाच्या मानसीकतेमुळे आजही त्यांना कुठेच काम मिळत नाही. लोक त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देतात. भीमथडीमधून आम्हाला एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे मागिल दोन वर्षांपासून आम्ही भीमथडीशी जोडले गेलो आहोत. आणि मागिल वर्षिच्या तुलनेत यावर्षी आम्हाला पुणेकरांकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे, आमच्या या अनोख्या पुढाकारास भीमथडीमुळे प्रोत्साहन मिळत आहे.