काय सांगता ! होय, बलात्काराच्या आरोपीने पीडित मुलीशी पोलीस ठाण्यातच बांधली ‘लग्नगाठ’
पोलीसनामा ऑनलाइनः राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात नुकताच एक अनोखा विवाह पार पडला आहे. बलात्कार करणा-या आरोपीने पोलीस ठाण्यातच बलात्कार पीडितेशी लगीनगाठ बांधली आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे आरोपी आणि पीडिता यांच्यात तडजोडीनंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. रामगंज मंडी पोलीस ठाण्याच्या आवारातील मंदिरात झालेल्या या लग्नाला पीडित मुलीचा भाऊ, आरोपीचे वडील आणि पोलीस उपस्थित होते. कोरोनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार हा विवाहसोहळा संपन्न झाला.
रामगंज मंडी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने शेजारी राहणाऱ्या मोतीलाल याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्या दोघांचे प्रेमप्रकरण होते. मात्र मोतीलालने मुलीशी लग्न करण्यास नकार दिल्यानंतर तिने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात पोलीस चौकशी सुरू असून हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. दरम्यान, रामगंज मंडी येथील उपविभागीय दंडाधिकारी बालकिशन तिवारी यांनी कोरोनामुळे या जोडप्यास लग्न करण्यास परवानगी नाकारली होती.