‘कोरोना’वरील लस बनवणार्‍या टीममध्ये भारतीय वंशाची शास्त्रज्ञ, ‘या’ शहराची रहिवाशी

लंडन : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोनाची लस बनवण्याच्या उपक्रमात काम करत असलेल्या ऑक्सफोर्डच्या टीममध्ये मुळ भारतीय वंशाची महिला शास्त्रज्ञ सुद्धा आहे. या शास्त्रज्ञाने म्हटले आहे की, मानवी उद्देशासाठी असलेल्या या उपक्रमाचा भाग होणे हा एक सन्मान आहे, ज्याच्या परिणामाकडे जगाचे लक्ष लागले आहे.

कोलकातामध्ये जन्मलेल्या चंद्रबाली दत्ता, विद्यापीठाच्या जेन्नेर इंन्स्टिट्यूटमध्ये क्लिनिकल बायोमॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये काम करतात. येथेच कोरोनाशी लढण्यासाठी सीएचएडीओएक्स1 एनसीओव्ही-19 वॅक्सीनच्या मानवी परीक्षणाचा दुसरा आणि तिसरा टप्पा सुरू आहे.

क्वालिटी अ‍ॅश्युरन्स मॅनेजर म्हणून 34 वर्षीय दत्ता ह्या वॅक्सीनची सर्व स्तरावर योग्य ती खबरदारी घेतली जात आहे का, हे पाहात आहेत. दत्ता यांनी म्हटले, आम्ही आशा करतो की, ही वॅक्सीन पुढच्या टप्प्यात यशस्वी होईल, संपूर्ण जग या वॅक्सीनकडे अपेक्षेने पहात आहे. या उपक्रमाचा भाग होणे एक प्रकारचा मानवी उद्देश आहे. आमची नॉन प्रॉफिट संस्था आहे. वॅक्सीन यशस्वी व्हावी यासाठी सर्वजण जास्तीत जास्त काम करत आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांचे जीवन वाचवता येतील. हा व्यापक सामुहिक प्रयत्न आहे. प्रत्येकजण यशासाठी काम करत आहे. या उपक्रमाचा भाग होणे हा एक सन्मान आहे.

बायो टेक्नोलॉजी पुरूष प्रधान क्षेत्राला आव्हान देण्यासाठी भारतात तरूण मुलींना प्रेरणा देणार असल्याचे दत्ता यांनी म्हटले आहेत. त्या म्हणाल्या, माझा लहानपणीचा मित्र नॉटींगहममध्ये शिक्षण घेत होता, त्याने मला प्रेरणा दिली. कारण ब्रिटन समान अधिकारासाठी ओळखले जाते. म्हणून या बायोटेक्नोलॉजीमध्ये मास्टर्स करण्याचा निर्णय घेतला. खरा संघर्ष भारत सोडून येणे हाच होता. माझी आई या निर्णयामुळे खुश नव्हती, परंतु माझे वडील संपूर्ण साथ देत होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like