COVID-19 च्या रूग्णांना वाचवण्यासाठी गुणकारी ठरू शकतं Dexamethasone औषध, जाणून घ्या

ऑक्सफोर्ड : वृत्तसंस्था – इंग्लंडमधील संशोधकांचे म्हणणे आहे की, प्रथमच असा परिणाम दिसून आला की, एक औषध कोविड-19 च्या रूग्णांना वाचवण्यासाठी उपयोगी ठरू शकते. डेक्सामेथासॉन नावाच्या स्टेरॉईडच्या वापराने गंभीर आजारी रूग्णांच्या मृत्यूदरात एक तृतीयांश घट झाली. मंगळवारी या परिणामांची घोषणा केली गेली आणि लवकरच हा अभ्यास प्रसिद्ध केला जाईल. मात्र, या शास्त्रज्ञांनी भारताच्या हायड्रोक्सीक्लोराक्वीन औषधाला कमी लेखण्याचा प्रयत्न देखील या संशोधनात केला आहे. यापूर्वी देखील असा प्रकार घडला आहे.

अभ्यासानुसार, सक्तीने तपासणी करणे आणि रँडमली 2104 रूग्णांना औषध देण्यात आले आणि त्यांची तुलना 4321 रूग्णांशी करण्यात आली, ज्यांची साधारण पद्धतीने देखभाल करण्यात येत होती. औषधाच्या वापरानंतर श्वसन संबंधी मशिन्ससह उपचार सुरू असलेल्या रूग्णांचा मृत्यूदर 35 टक्क्यांपर्यंत घटला. ज्यांना ऑक्सीजनचा आधार दिला जात होता त्यांच्यामध्ये सुद्धा मृत्यूदर 20 टक्के कमी झाला. ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे संशोधक पीटर होर्बो यांनी म्हटले की, हे खुपच उत्साहजनक आहे.

त्यांनी म्हटले की, मृत्युदर कमी करण्यात आणि ऑक्सीजनची मदत लागणार्‍या रूग्णांमध्ये स्पष्ट पद्धतीने याचा फायदा झाला. यासाठी अशा रूग्णांमध्ये डेक्सामेथासॉन चा वापर झाला पाहिजे. डेक्सामेथासॉन औषध महागदेखील नाही आणि जगभरात याचा उपयोग जीव वाचवण्यासाठी केला जाऊ शकतो. याच अभ्यासात म्हटले होते की, मलेरियाच्या उपचारात वापरले जाणारे औषध हायड्रोक्सीक्लोरोक्वीन कोरोना व्हायरसच्या उपचारात उपयोगी नाही. अभ्यासात इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडमधील 11,000 पेक्षा जास्त रूग्णांना सहभागी करून घेण्यात आले होते. इंग्लडमधील संशोधक भारतातील हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाला जगाच्या समोर निरूपयोगी ठरवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असल्याचे यापूर्वी देखील उघड झाले आहे.