वृत्तसंस्था – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे. ब्रिटनमध्ये देखील कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. दोनच दिवसांपुर्वी ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना देखील कोरोनाला लागण झाल्याची माहिती समोर आली होती आणि आता पंतप्रधानांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.
United Kingdom Prime Minister Boris Johnson tests positive for #COVID19 pic.twitter.com/ZgQj4gV7sz
— ANI (@ANI) March 27, 2020
ब्रिटनच्या आरोग्य मंत्री नदीन डॉरिस यांना देखील कोरोनाची बाधा झाल्याची माहिती 11 मार्च रोजी समोर आली होती. त्यांना बाधा झाल्यानं त्यावेळी ब्रिटनमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. डॉरिस यांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं होतं. त्या ट्विटरच्या माध्यमातून सक्रिय होत्या. त्याचवेळी पंतप्रधानांची तपासणी होणार असल्याचं निश्चित झालं होतं. आता पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.