घोडेस्वारी करताना दिसल्या 94 वर्षांच्या महाराणी एलिझाबेथ

लंडन : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमध्ये पतीसोबत विंडसर पॅलेसमध्ये आयसोलेटेड ब्रिटनच्या दुसर्‍या महारानी एलिझाबेथ प्रथमच घोडेस्वारी करताना दिसल्या. घोडे आणि घोडेस्वारीची आवड असणार्‍या 94 वर्षीय महाराणीने रविवारी काळ्या रंगाच्या घोड्यांची सवारी केली.

घोडेस्वारीच्या दरम्यान महाराणीने डोक्याला गुलाबी रंगाचा स्कार्फ आणि हातात सफेद रंगाचे हातमोजे घातले होते. यापूर्वी महाराणीचे शेवटचे छायाचित्र 19 मार्चरोजी समोर आले होते, जेव्हा त्या बकिंगहम पॅलेसच्या समोर आल्या होत्या.

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी 23 मार्चपासून लॉकडाऊन लावण्यात आला होता. ब्रिटनमध्ये आता कोविड-19 ची 2,74,762 प्रकरणे आहेत, आणि 38,489 लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like