‘वयस्कर’ आणि ‘गंभीर’ आजाराने ग्रस्त असलेल्यांसाठी ‘कोरोना’ जास्त ‘घातक’ : संशोधक

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोविड – 19 संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूच्या मुख्य कारणांबद्दल जगभरात बरेच संशोधन होत आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये, वयाबरोबर व्यक्तीचा पहिला आजार हा सर्वात प्रमुख घटक मानला जातो. यासोबतच, एक आश्चर्यकारक सत्य देखील समोर आले आहे आणि ते म्हणजे – व्यक्तीचे पुरुष असणे. या अभ्यासात असे म्हटले आहे की मधुमेह, श्वसन व फुफ्फुसांचा आजार आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या लोकांचा कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाला आहे.

50 वर्षांपेक्षा जास्त आणि गंभीर रोगांनी ग्रस्त लोकांना कोरोनाचा धोका
ब्रिटिश मेडिकल जनरल (बीएमजे) मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे प्रौढ, पुरुष, लठ्ठपणा, हृदयरोग, फुफ्फुस, यकृत आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजारांने ग्रस्त लोकांना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यूचा सर्वाधिक धोका असतो. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अभ्यासात यूकेच्या लिव्हरपूल विद्यापीठाच्या संशोधकांसहित इतरांनी इंग्लंडमधील रुग्णालयात दाखल झालेल्या कोविड 19 रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले गेले आहे.

43,000 पेक्षा जास्त रुग्णांच्या केस हिस्ट्रीतून संशोधकांनी शोधली कारणे
या संशोधनासाठी 43,000 हून अधिक रुग्णांचा समावेश होता. 6 फेब्रुवारी ते 19 एप्रिल दरम्यान इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंडच्या 208 रूग्णालयात दाखल झालेल्या 20,133 रूग्णांच्या डेटाचे विश्लेषणही त्यांनी केले आहे. या अभ्यासाच्या साहाय्याने आता आरोग्य कर्मचार्‍यांना या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंविषयी अधिक चांगली माहिती मिळू शकेल.

स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त
अभ्यासानुसार, रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांचे सरासरी वय 73 वर्षे होते आणि स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची संख्या जास्त होती. अधिक व्याबरोबरच त्यांना हृदय, फुफ्फुस, यकृत आणि मूत्रपिंडाचा आजार होता. मृतांच्या संख्येत या रुग्णांचीच संख्या जास्त आहे. संशोधकांनी अभ्यासानुसार असा इशारा दिला की, हे एक निरीक्षण आहे, पूर्णपणे स्थापित घटक नाही. ते म्हणाले की यापुढेही संसर्गाबाबत आपण सावध राहिले पाहिजे.