जीन टीएलआर7 नं काम करणं बंद केल्यास ‘कोरोना’ संसर्ग होतो आणखीच ‘गंभीर’

लंडन : संशोधकांनी माणसात एक अशा जीन टीएलआर7 चा शोध लावला आहे जो नोवल कोरोना व्हायरसच्या संसर्गात प्रतिकारशक्तीत महत्वाची भूमिका पार पाडतो. संसर्गादरम्यान हा जीन आपले काम करणे बंद करतो. या नव्या शोधामुळे जागतिक महामारी कोविड-19 चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी मदत होणार आहे.

अमेरिकन मेडिकल असोसिएशन जरनलमध्ये प्रकाशित या शोधात म्हटले आहे की, कोविड-19 ने गंभीरप्रकारे पीडित दोन कुटुंबातील चार तरूणांच्या अनुवंशिक क्रमाचा सखोल अभ्यास आणि विश्लेषण करण्यात आले. कोविड-19 च्या या गंभीर रूग्णांना अगोदरपासून कोणताही आजार नव्हता. नेदरलँड रॅडबड युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या वैज्ञानिकांनुसार या रूग्णांमध्ये जीन टीएलआर7 चा एक प्रकार आढळून आला. शिवाय, प्रतिकारशक्तीचे अणु टाइप-1 आणि 2 इंटरफेरोनसच्या निर्मितीत कमतरता आढळून आली. कोविड-19 ने गंभीरप्रकारे पीडित या रूग्णांना यापूर्वी कधीही श्वास घेण्यास त्रास झाला नव्हता आणि आता त्यांना या त्रासामुळे आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.

मानवी पेशीच्या पृष्ठभागावर आढळतात जीन टीएलआर7
या संशोधनात अशा प्रकारच्या जीनच्या क्रमांकास बदलून आणि अन्य नातेवाईकांकडून पडताळणीत आढळले की, या चारही रूग्णांच्या जीन टीएलआर7 ने एक आवश्यक काम करणे बंद केले होते. या चारही रूग्णांमध्ये एक्स क्रोमोजोमच्या टीएलआर7 मध्ये टाइप-1 आणि 2 आयएफएन प्रत्युत्तरांची कमतरता आढळली. याचा अर्थ हा आहे की, टीएलआर जीनकडून प्रोटीनचे ग्रहण केले जाऊ शकते. हे मानवी पेशींच्या पृष्ठभागावर असतात. यांची रोगाणुंना ओळखण्यात महत्वाची भूमिका असते. हे शरीरात सक्रिय बॅक्टेरिया आणि व्हायरसला ओळखतात आणि प्रतिकारशक्तीला सक्रिय करतात. टीएलआर7 तर इंटरफेरोनसला सक्रिय करतात, ज्याद्वारे व्हायरस संक्रमणाला ओळखण्यसाठी प्रोटीनला सक्रिय केले जाते.

सह संशोधक अलेक्झेंडर ह्यूशेन यांनी सांगितले की, यापूर्वी नेहमी टीएलआर7 ला जन्माच्यानंतर प्रतिकारशक्तीत झालेल्या गडबडीशी जोडले गेले होते. यासाठी कोरोना व्हायरसच्या संक्रमणाशी लढण्यासाठी याची भूमिका खुप महत्वाची आहे. कारण टीएलआर7 चे काम शरीरात कोणत्याही घुसखोराची ओळख पटवून त्यापासून बचाव करणे आहे, जे संक्रमणाच्या नंतर होऊ शकत नाही. याच करणामुळे या भावांमध्ये अगोदर कोणताही आजार नसताना त्यांच्यात कोरोनाचे गंभीर संक्रमण झाले.