UN च्या कारमधील ‘सेक्स’चा व्हिडिओ व्हायरल, संयुक्त राष्ट्रानं दुःखद घटना असल्याचं सांगितलं, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युनायटेड नेशन्सच्या अधिकाऱ्याने एका महिलेसह कारमध्ये शारीरिक संबंध ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. इज्राइलची राजधानी तेल अवीव येथून हा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रने म्हटले की, ही घटना अत्यंत धक्कादायक आणि त्रासदायक आहे.

व्हायरल क्लिपमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, लाल पोशाख घातलेली एक महिला एका व्यक्तीसह कारच्या मागील सीटवर बसली आहे. या व्यतिरिक्त कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवरही एक व्यक्ती दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर युएनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी ते अगदी जवळ होते.

यूएनने म्हटले की, ‘इज्राइलमधील शांतता संघटनेच्या कर्मचार्‍यांनाही संशयास्पद मानले जात आहे. व्हिडिओ तेल अवीव मधील एका मुख्य रस्त्याचा आहे. यापूर्वी व्हिडिओमध्ये ड्रायव्हरचा चेहरा स्पष्ट दिसला असता, पण गाडी तेथून निघून गेली.’ ट्रॅफिक सिग्नलवर वाहन थांबल्यानंतर कोणीतरी हा व्हिडिओ इमारतीच्या वरून घेतला होता.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेसचे प्रवक्ते स्टीफन डूजारिक म्हणाले की, १८ सेकंदाचा हा व्हिडिओ व्यावहारिकपणे अत्यंत घृणास्पद आहे. आम्ही ज्या विरोधात उभे आहोत, त्याविरुद्ध जाऊन यूएनच्या कर्मचार्‍यांद्वारे अशी प्रकरणे समोर येत आहेत.’

ते म्हणाले, “ही कार ‘युनायटेड नेशन्स ट्रस सुपरव्हिझन ऑर्गनायझेशन’ची असल्याचे आतापर्यंत उघड झालेल्या माहितीवरून समजले आहे. कारमधील सेक्स दोन लोकांच्या संमतीने झाले किंवा त्यासाठी पैसे दिले गेले होते, याचा गांभीर्याने तपास केला जात आहे.”

डूजारिक म्हणाले, ‘या व्हिडिओशी संबंधित घटनेचे ठिकाण ओळखले गेले आहे. व्हिडिओमधील जागा हायारकोर्न रोडची आहे. सहसा या ठिकाणी खूप गर्दी असते. चौकशीत लवकरच आरोपी समोर येईल.’

लैंगिक शोषण व अत्याचारांबाबतचे संयुक्त राष्ट्रांचे धोरण अत्यंत कठोर आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते.

या प्रकरणात शांतता संघटना दोषींवर बंदी घालू शकते आणि त्यांना त्यांच्या देशात परत पाठवू शकते. मात्र हा अधिकार आरोपीच्या देशाला आहे की, ते त्याच्यावर शिस्तभंगाची किंवा कायदेशीर कारवाई करणार आहेत.

संयुक्त राष्ट्र संघ बऱ्याच काळापासून त्याच्या शांतता सैनिक आणि इतर कर्मचार्‍यांद्वारे लैंगिक गैरवर्तन केल्याच्या आरोपाची चौकशी करत आहे. गेल्या काही वर्षांत अशी प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. तर स्वत: यूएनचे सरचिटणीस गुटेरेस यांनी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात सामील असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी शून्य सहिष्णुता असल्याचे सांगितले आहे.

लैंगिक अत्याचाराबाबत कसा आहे यूएनचा ट्रॅक रेकॉर्ड ?
ह्यूमन राइट्स वॉचच्या सह-संचालक हीथर बार यांनी सांगितले की, इज्राइलमधून व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून त्यांना अजिबात आश्चर्य वाटले नाही. त्या म्हणाल्या, ‘हे चांगले आहे की यूएन या प्रकरणाची चौकशी करत आहे. पण या व्हिडिओशिवाय देखील आणखी बर्‍याच मोठ्या समस्या आहेत.’

या समस्या संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे लैंगिक शोषण आणि अत्याचारांच्या आरोपाशी संबंधित आहेत. त्यामुळे अशा प्रकरणात फारसे आश्चर्य वाटण्याची गरज नाही.

एका अहवालानुसार, सन २०१९ मध्ये लैंगिक शोषण आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या कर्मचार्‍यांच्या गैरवर्तनाशी संबंधित १७५ प्रकरणे समोर आली होती. त्यापैकी केवळ १६ जणांवरील आरोप सिद्ध झाले, तर १५ प्रकरणे निराधार घोषित करण्यात आली. इतर सर्व प्रकरणांत अद्याप चौकशी चालू आहे.