‘कोरोना’च्या संभाव्य लसीवर अमेरिकेनं केली ‘डबल’ गुंतवणूक, ‘मॉडेर्ना’च्या ट्रायलचा अंतिम टप्पा आजपासून सुरू

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – अमेरिकेने मॉडेर्नाने तयार केलेल्या लसमध्ये आपली गुंतवणूक दुप्पट करून एक मिलियन डॉलर म्हणजेच 74 अब्ज रुपये, जवळजवळ पहिल्यापेक्षा दुप्पट केले आहे. मॉडेर्ना सोमवारी त्यांच्या लसीच्या क्लिनिकल ट्रायलच्या अंतिम टप्प्यास प्रारंभ करतील.

मॉडेर्ना बायोटेक्नॉलॉजीने सांगितले की, अमेरिकन सरकार 35 अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे. मॉडेर्नाने सांगितले की, सरकारने जाहीर केलेल्या रकमेवर त्या समाधानी आहे, यामुळे 30,000 रूग्णांच्या क्लिनिकल चाचणीस मदत होईल. मोडेर्नाच्या सुरुवातीच्या चाचणीत, लसीने कोरोना विषाणूविरूद्ध अँटीबॉडी बनविली होती. सोमवारी सुरू होणार्‍या लसीच्या चाचणीत, 30,000 पैकी निम्म्या रूग्णांना 100 मायक्रोग्राम लस डोस मिळतील, तर उर्वरित लोकांना प्लेसबो देण्यात येईल. अमेरिकेत आतापर्यंत 1,46,000 लोकांचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला आहे आणि दररोजच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

पुढील महिन्याच्या सुरुवातीला लाखो अमेरिकन लोकांना ही लस मिळावी म्हणून अमेरिकेने ही लस बनविण्यामध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी अमेरिकन-जर्मन कंपनी बायोनोटॅक फार्मास्युटिकलने सांगितले की, अमेरिकेने 1.95 मिलियन डॉलर्स जाहीर केल्याची बातमी दिली. जगातील अनेक प्रयोगशाळेमध्ये लसीच्या लवकर उत्पादनाची तयारी दर्शवित आहेत, परंतु कंपनीने अंतिम क्लिनिकल चाचणी सुरू केल्यामुळे कोरोना व्हायरस लस प्रथम मॉडेर्ना कंपनीकडे आणण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हा मॉडेर्नाचा शेवटचा टप्पा असेल, ज्यामध्ये हे समजले जाईल की, ही लस प्रभावी आणि सुरक्षित आहे. मॉडेर्ना अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहेत. मॉडेर्ना यांचे म्हणणे आहे की, दरवर्षी कोरोना लसीचा 50 कोटी डोस तयार करू शकते. येथे, चीनी बायोटेक कंपनी सिनोव्हॅक यांनी 6 जुलै रोजी सांगितले की, ते देखील या महिन्यात आपली क्लिनिकल चाचणी सुरू करू शकते. सिनोव्हॅक ब्राझीलमधील बट्टानटन बायोलॉजिक रिसर्च सेंटरसोबत मिळून काम करत आहेत. याव्यतिरिक्त, अ‍ॅस्ट्रॅजेनेका प्रयोगशाळेसह ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस देखील चांगले निकाल देत आहे.