Coronavirus : अमेरिकेत पोहचला ‘कोरोना’ व्हायरस, ‘सिअटल’मध्ये पहिलं प्रकरण, ‘WHO’ नं बोलावली तात्काळ बैठक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये सार्ससारख्या नव्या विषाणूच्या कचाट्यात सापडून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी हा आकडा समोर आला आहे. आतापर्यंत देशात अशी 440 प्रकरणं समोर आली आहेत. राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे उपमंत्री लीन बी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, कोरोना व्हायरस श्वसन संस्थेतून पसतो. यामुळे व्हायरल म्युटेशन किंवा रोगाचं संक्रमण होण्याचा धोका असतो. अशातच आता अमेरिकेनं देशात या विषाणुचं पहिलं प्रकरण समोर आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमेरिकेनं तेथील सिएटलमध्ये हे प्रकरण समोर आल्याचं सांगितलं आहे. ही बाब गंभीरतेनं घेत जागतिक आरोग्य संघटनेनं आज तातडीनं एक बैठक बोलावली आहे. अमेरिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितलं की, चीनमधील एका व्हायरसशी संबधित एक प्रकरण समोर आलं आहे. पीडितेचं वय 30 ते 35 च्या दरम्यान असल्याचं फेडरल आणि राज्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तो वुहानमधून अमेरिकेत आल्याचंही त्यांनी सांगितलं.

सध्या या व्हायरचं केंद्र बनलेल्या सीफूड मार्केटमध्ये पीडित गेला नव्हता. त्यांनी असंही सांगितलं की, त्या व्यक्तीला खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरल चीनच्या वुहान शहारातून आता चीनच्या बाहेर पोहोचताना दिसत आहे. विमानतळांवर आरोग्य तपासणी अधिक प्रभावी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरस पीडित व्यक्तीला वॉशिंग्टनच्या प्रादेशिक वैद्यकीय केंद्रात ठेवण्यात आलं आहे.

पीडित व्यक्ती वॉशिंग्टनच्या स्नोहोमिश काऊंटीचा रहिवाशी आहे. पीडित 15 जानेवारी रोजी सिएटलमधील टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला होता. यापर्वी विमानतळावर या व्हायरसला घेऊन कोणतीही तपासणी सुरु नव्हती. त्याला 19 जानेवारी वैद्यकीत केंद्रात आणण्यात आलं.

अधिकारी करत आहेत या गोष्टींचा तपास
अमेरिकेतील अधिकारी या गोष्टीचा तपास करत आहेत की, पीडित चीनमधून अमेरिकेतपर्यंतच्या आपल्या प्रवासात कोण कोणत्या व्यक्तींच्या संपर्कात आला होता.

माणसांमध्ये पसरणाऱ्या या व्हायरसमुळे चीनमध्ये 6 जणांचा मृत्यू
रहस्यमय कोरोना व्हायरस चीनमध्ये एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पसरत आहे. देशभरात या व्हायरसमुळे पीडित लोकांची संख्या 300 च्या पुढे गेली होती. देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा व्हायरस वुहाननंतर बीजिंगसहित इतर चीनी शहरात पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं यावर आज तातडीची बैठक बोलावली आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी यावर दिलेल्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, “वुहान तसेच इतर ठिकाणी पसरलेल्या नव्या कोरोना व्हायरस निमोनियाला गंभीरतेनं घ्यायला हवं.”

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like