अमेरिकाही TikTok सह इतर चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या तयारीत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता अमेरिकादेखील बंदी घालण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी अमेरिका चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे.

लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने 29 जून रोजी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण 59 अ‍ॅपवर बंदी घातली आहे. त्यानंतर आता माइक पोम्पिओ यांनी अमेरिका टिकटॉकसह चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. आत्ता या विषयावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झालेली नाही. परंतु ही बाब अशी आहे की आम्ही निश्चितच विचार करत आहोत, असे माइक पोम्पिओ यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारने टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण 59 अ‍ॅपवर बंदी घातली आहे. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केलं. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like