Facebook-Twitter बॅननंतरही Active आहेत ट्रम्प समर्थक; ‘या’ Apps चा घेताहेत ‘आधार’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेतील कॅपिटल हिल येथे झालेल्या हिंसाचारानंतर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांविरोधात फेसबुक आणि ट्विटरने मोठी कारवाई केली. या दोन्ही कंपन्यांनी ट्रम्प यांच्या समर्थकांचे अकाउंट बॅन केले आहे. पण आता डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी दुसरा पर्याय निवडला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांवर हिंसा भडकावणे आणि चुकीची माहिती पसरवण्याचा आरोप आहे. मात्र, समर्थकांनी त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी स्थानिक न्यूज चॅनेलचे माध्यम निवडले आहे. आता याच माध्यमातून जगभरात पोहोचवण्यासाठी पर्यायी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते ऍक्टिव्ह आहेत. पण ट्विटर आणि फेसबुकचा पर्याय म्हणून Telegram, MeWe आणि Gab यासह विविध ऍप्सचा पर्याय निवडला आहे.

‘या’ ऍप्सने घेतली ट्विटर-फेसबुकची जागा
अभ्यासक निक बॅकोविक यांनी सांगितले, की Gab, MeWe, Telegram, Discord आणि काही इतर ऍप्सने ट्विटर, फेसबुक, मेसेंजरची जागा घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक यापूर्वी पर्यायी प्लॅटफॉर्मवर होते. मात्र, फेसबुक आणि ट्विटरने बऱ्याच काळापासून अकाउंट्स बॅन केले आहे. फेसबुकने सुमारे 900 अकाउंट बंद केले तर ट्विटरने 70 हजार अकाउंटला ब्लॉक केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प समर्थकांसाठी मोठा झटका
हिंचारासानंतर ट्विटरने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट सस्पेंड केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट्सची समीक्षा केल्यानंतर आम्ही अकाउंट सस्पेंड करण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीने सांगितले होते.