Coronavirus : अमेरिकेत ‘कोरोना’चे थैमान ! 24 तासांत 2 हजार 494 बळी

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाने जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत अक्षरशा थैमान घातले आहे. चोवीस तासांत अमेरिकेत तब्बल 2 हजार 494 जाणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या संख्या आता एकूण 53 हजार 511 वर पोहचली आहे.  आतापर्यंत तेथे तब्बल 9 लाख 36 हजार 293 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी अमेरिकेत औषधे व लस मिळून एकूण 72 घटकांवर चाचण्या सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त स्टीफन हान यांनी व्हाइट हाउस येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, लस व औषधे शोधून काढण्याचे काम प्रगतिपथावर असून अन्न व औषध प्रशासनाने दोन आस्थापनांना लसच्या चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे. कोरोनावर उपचार शोधून काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. सध्यातरी कोरोनावर कुठलेही मान्यता प्राप्त औषध नाही. व्यावसायिक, संशोधक व खासगी क्षेत्र यांना आम्ही उपचार शोधून काढण्यात सहभागी केले आहे, औषधे व  लस मिळून 72 चाचण्या सुरू आहेत. 211 घटकांच्या चाचण्या नियोजन पातळीवर आहेत. त्यात विषाणूविरोधी उपचार व रक्तद्रव उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. उत्पादकांना प्रतिपिंड चाचण्यांसाठीच्या संचांची अधिकृत तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. या चाचण्यांना एफडीएने परवानगी मात्र दिलेली नाही.