Coronavirus : अमेरिकेत ‘कोरोना’चा ‘हाहाकार’ ! सलग दुसर्‍या दिवशी 2000 लोकांचा मृत्यु, आतापर्यंत 14788 जणांचा बळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा कहर अमेरिकेत थांबता थांबत नाही. सलग दुसर्‍या दिवशी अमेरिकेत २ हजार जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ४ लाख ३४ हजार ९२७ जणांना लागण झाली असून एकूण १४ हजार ७८८ जणांचा मृत्यु झाला आहे. सर्वात भयानक परिस्थिती न्यूयॉर्क शहराची झाली आहे. एकट्या न्यूयॉर्क शहरात दीड लाख लोकांना कोरोना विषाणूची बाधा झाला आहे. अमेरिकेत जितक्या लोकांचा मृत्यु झाला. त्यापैकी निम्मे मृत्यु हे न्यूयॉर्क शहरात झाले आहेत. न्यूयॉर्कमध्ये बुधवार सायंकाळपर्यंत ६ हजार २६८ जणांचा मृत्यु झाला होता.

अमेरिकेत बुधवारी एकूण १ हजार ९४० जणांचा मृत्यु झाला आहे. ७ एप्रिल रोजीही अमेरिकेत १९७१ जणांचा मृत्यु झाला होता. त्याचबरोबर दररोज नव्याने लागण झालेल्यांची संख्याही गगनाला भिडणारी आहे. बुधवारी अमेरिकेत तब्बल ३१ हजार ९३६ जण नव्याने कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे.

न्यूयॉर्कमध्ये बुधवारी एका दिवशी आतापर्यंतचे सर्वाधिक ७७९ जणांचा मृत्यु झाला आहे. मरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये कोरोना विषाणूमुळे ७३१ जणांचा मृत्यु झाला होता.  अमेरिकेवर तालिबानने केलेल्या ९/११ च्या हल्ल्यात न्यूयॉर्कमध्ये २ हजार ७२३ जणांचा मृत्यु झाला होता. त्याच्या दुप्पटीहून अधिक न्यूयॉर्कमधील ६ हजार २६८ जणांचा बळी या कोरोना विषाणूने आतापर्यंत घेतला आहे.  न्यूयॉर्कचे गर्व्हनर एंड्र्यु कुओमो ने ही केवळ दुखद घटना नाही तर भयानक बातमी आहे. आज सर्वाधिक मृत्यु झाले असून मरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.