ग्लॅमरस खेळांच्या भोवऱ्यात मातीतल्या कुस्तीशी जागतिक कुस्ती संघटनेने तोडले नाते 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मातीशी जोडलेला खेळ म्हणून भारतात ओळख असणाऱ्या कुस्तीकडे आधीच इतर खेळांमुळे दुर्लक्ष होत असताना आता भारतीय कुस्ती महासंघाशी  (WFI) सर्व संबंध तोडून टाकावेत, अशा सूचना जागतिक कुस्ती संघटनेनं इतर सर्व राष्ट्रीय संघटनांना दिल्या  आहे.

या संबंधी त्यांनी इतर राष्ट्रीय संघांना पत्र लिहून भारतीय कुस्ती महासंघासोबतचे सर्व संबंध तोडून टाकावेत, अशा सूचना दिल्या आहेत.  नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत भारतानं पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारला होता. त्यामुळं जागतिक कुस्ती संघटनेनं हा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे.

याआधी पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारल्यानं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं यापुढे भारतात आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला होता . त्यानंतर आता जागतिक कुस्ती संघटनेनं सुद्धा भारताला आणखी एक झटका देत भारतीय कुस्ती महासंघाशी सर्व संबंध तोडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण आणि सहायक सचिव विनोद तोमर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.