ब्रह्मांडच नाही तर गुगल पेजलाही उध्वस्त करत आहे ‘अवेंजर्स’चा विलेन Thanos ; एकदा डेमो पहाच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध हॉलिवूडपट अवेंजर्स एंडगेम आजच सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. हा अमेरिकन सुपरहिरो असणारा सिनेमा मार्वल कॉमिक्सवर आधारीत आहे. भारतातही या सिनेमाचे लाखो चाहते आहेत. भारतातील या सिनेमाचे चाहतेही या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. मागील काही वर्षांपासून अवेंजर्स एंडगेमची जगात क्रेज निर्माण झाली आहे. ही क्रेज असण्याचं आणखी एक कारण आहे की, अवेंजर्स एंडगेम हा सिनेमा या अवेंजर्सच्या सिरीजचा शेवटचा सिनेमा आहे.

या सिनेमात प्रत्येक अवेंजर हा थानोस मारण्यासाठी विचार करत आहे. थानोस हा सिनेमातील विलेन आहे. थानोस हा असा विलेन आहे जो पूर्ण ब्रह्मांडाच नष्ट करु इच्छित आहे. दुसरीकडे सर्व अवेंजर्स ब्रह्मांडाला वाचवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहेत. अशातच आता गुगलवर असे काही आले आहे जे पाहून तुम्ही थक्क व्हाल. नंतर तुम्हाला त्याचं हसूही येईल हा भाग वेगळा.

गुगलवर थानोसला सर्च केल्यानंतर त्याच्या हाताच्या इमेजवर ट्रिक करण्यात आली आहे. तुम्ही जर या हाताच्या इमेजवर क्लिक केलं तर तुम्ही सर्च केलेल्यापैकी काही लिंक गायब होताना दिसत आहेत. ही ट्रिक तुम्हीही करून पाहू शकता.

कशी कराल ही ट्रीक ?

– गुगलवर जाऊन इंग्रजीत Thanos असं सर्च करा.
– तुम्हाला उजव्या बाजूला वरतीच थानोसच्या काही इमेजेस दिसतील. त्यातील थानोसच्या हाताच्या इमेजवर तुम्हाला क्लिक         करायचे आहे.
– जसंही तुम्ही थानोसच्या हाताच्या इमेजवर क्लिक करता तेव्हा जादू झाल्यासारखं वाटेल. तुम्ही सर्च केलेल्या पेजवरील अनेक     लिंक तुम्हाला गायब होताना दिसतील. हे सगळं पाहून तुम्ही खूप एन्जॉय कराल हे मात्र नक्की.