CBSE टॉपर्सला मिळणार पंतप्रधानांच्या बॉक्समूधन 26 जानेवारीची परेड पाहण्याची संधी, शिक्षणमंत्री सुद्धा भेटणार

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीला होणार्‍या परेडमध्ये यावेळी सीबीएसईचे (CBSE) 10वी- 12वीचे टॉपर्स सहभागी होऊ शकतील. अकॅडमिक इयर 2020 चे टॉपर्स आणि युनिव्हर्सिटीजच्या ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट टॉपर्सला पीएम बॉक्समधून प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्याची संधी दिली जाईल. इतकेच नव्हे, या विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांना सुद्धा भेटण्याची संधी मिळेल. येथे शिक्षणमंत्री या विद्यार्थ्यांना प्रशस्ती प्रमाणपत्राने सन्मानित करतील.

शिक्षणमंत्र्यांनी स्वत: ही माहिती ट्विट करून दिली आहे. मंत्रालयाकडून जे ट्विट करण्यात आले त्यामध्ये लिहिले आहे की, माहिती देताना आनंद होतो की, देशभरातील हुशार विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या बॉक्समधून प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्याची संधी मिळेल आणि त्यांना शिक्षणमंत्र्यांना भेटण्याची आणि चर्चा करण्याची सुद्धा मिळेल. कोविड प्रतिबंधामुळे या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणार्‍यांची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत 600 वरून कमी करून 401 केली आहे.

 

 

 

 

संरक्षण मंत्रालयाने अगोदर म्हटले होते की, दिल्लीतील चार शाळांचे एकुण 321 विद्यार्थी आणि राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात कोलकाताचे 80 लोक कलाकार सहभागी होतील. कलाकारांची निवड कोलकाताच्या ईस्टर्न झोनल कल्चरल सेंटरने केली आहे आणि विद्यार्थ्यांची निवड डीटीईए सीनियर सेकेंडरी स्कूल, माऊंट आबू पब्लिक स्कूल, विद्या भारती स्कूल, गव्हर्नमेंट गर्ल्स सीनियर सेकेंडरी स्कूलमधून करण्यात आली आहे.