home page top 1

SPPU : येत्या २१ रोजी होणार पुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११५ वा पदवीप्रदान समारंभ येत्या दि. २१ जून रोजी (शुक्रवार) आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख आतिथी म्हणून मा. डॉ. बैरत्राँ द हार्टिंग (भारतातील फ्रेंच दूतावासातील अधिकारी) हे उपस्थित राहणार आहेत. ते स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करतील अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आलीं आहे . यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने एक प्रेस नोट काढली आहे.

दरम्यान, सन २०१७-१८ मध्ये आणि त्याआधी उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील ६२१२ विद्यार्थ्यांना विद्यापीठात पदवी प्रमाणपत्रे वितरित करण्यात येणार आहेत. यापैकी १२७ विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवीची प्रमाणपत्रे व ६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत.

पदवी प्रमाणपत्रांचे वितरण २१ जून २०१९ रोजी विद्यापीठ परिसरातील परीक्षा भवनामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत वितरित केले जाणार आहे. जे विद्यार्थी अनुपस्थित राहतील त्यांची पदवी प्रमाणपत्रे संबंधित विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पाठवण्यात येतील.

पुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ वर्षातून दोनदा होत असून यामुळे पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी घेणे सोयीचे होत असल्याचे विध्यार्थ्यानी सांगितले.

पदव्यांचा तपशील पुढीलप्रमाणे

पदवी (Graduate) : ३९६५

पदव्युत्तर पदवी (Post-graduate) : १९९५

पीएच. डी. (Ph.D.) : ०१२७

पदव्युत्तर पदविका (P.G. Diploma) : ००२९

एम. फिल. (M.Phil) : ००६४

पदविका (Diploma) : ००३२

विद्याशाखांनुसार तपशील

विज्ञान व तंत्रज्ञान (Science & Technology) : ३१५४

वाणिज्य व व्यवस्थापन (Commerce & Management) : १६९८

मानव्यशाखा (Humanities) : १०९२

विद्याशाखांतर्गत (Interdisciplinary) : ०२६८

आरोग्यविषयक वृत्त

#YogaDay2019 : योगाभ्यास करण्यापूर्वी प्रथम वज्रासन शिका
#YogaDay2019 : ज्ञानमुद्रेद्वारे जागृत करा; तुमच्या ‘सुप्त शक्ती’

#YogaDay2019 : अपचनाचा त्रास आहे? वज्रासन केल्यास मिळेल आराम
#YogaDay2019 : निरोगी व आकर्षक चेहऱ्यासाठी सर्वोत्तम मार्ग ‘फेस योगा’

Loading...
You might also like