विद्यापीठ युवक महोत्सव ग्रामिण विभागात इंदापूर महाविद्यालय सर्वोत्कृष्ट

इंदापूर : पोलीसनाम ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे संपन्न झालेल्या विद्यापीठ स्तरिय युवक महोत्सवामध्ये विविध कलाप्रकारात सहभाग घेत ग्रामीण विभागांमध्ये इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणीज्य महाविद्यालयाने सर्वोत्कृष्ट महाविद्यालय मान मिळविला. तसेच उपविजेता पदक आणि नाट्य विभागात चॅम्पियनशिप प्राप्त केली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय चाकणे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विशाल मोरे यांनी इंदापूर येथे दिली.

इंदापूर महाविद्यालयात पदक प्राप्त विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव मुकुंद शहा आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तर दि.५ व ६ नोव्हेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. एकुण २५ कलाप्रकाराचे सादरीकरण केले असून. या कलाप्रकारात आय कॉलेज इंदापूर ने जास्तीत जास्त कलाप्रकारात भाग घेत उत्कृृष्ट यश मिळवले.

महाविद्यालयाला ग्रामीण विभागात उत्कृष्ट महाविद्यालय, नाट्यविभागात सर्वसाधारण विजेतेपद त्या बरोबरच “काडीमोड” या एकाकिंका मध्ये प्रथम क्रमांक, मोबाईलचे चांगले वाईट परिणाम हा सामाजिक संदेश देत प्रहसन मध्ये प्रथम क्रमांक, भारतीय लोकवाद्य पखवाजमध्ये प्रथम क्रमांक, लोकवाद्यमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून विद्यापीठस्तरीय सर्वसाधारण उपविजेता पदाचा मान मिळविला. विद्यार्थी विकास जिल्हा समन्वयक प्रा.बाळासाहेब काळे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. तानाजी कसबे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा.आत्माराम फलफले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.विशाल मोरे यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. युवराज फाळके, प्रा. मयुर मखरे, प्रा.दत्ता रास्ते यावेळी उपस्थित होते.

Visit : Policenama.com