मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – माणसाला हाडांना आयुष्यभर काळजी आणि पोषणाची आवश्यकता असते. मनुष्याच्या सांगाडा महत्त्वपूर्ण कार्य करतो. उदा. रक्ताची संरचना कायम ठेवणे, शरीराची हालचाल आणि नवीन कोशिकांचे निर्माण करणे. मनुष्य सांगाड्याशी संबंधित चकित करणारे काही तथ्य आपण जाणून घेणार आहोत.

माणसाच्या शरीरात अध्र्यापेक्षा जात हाडे हात आणि पायामध्ये असतात. शरीरामध्ये हाडांचे विभाजन समान होत नाही. हातामध्ये २७ आणि पायामध्ये २६ हाडे असतात. याचा अर्थ दोन्ही हात आणि पायामध्ये एकूण १०६ हाडे असतात. अशाप्रकारे शरीरातील अध्र्यापेक्षा जास्त हाडे हात आणि पायामध्ये असतात. मनुष्य शरीरात सर्वात ठोस टूथ इनॅमल (दातांचे आवरण) असते. टूथ इनॅमल दातांचे रक्षण करते आणि यांना कायम ठेवते. कॅल्शियमसारख्या मिनरल्समुळे हे मजबूत राहते. आपली हाडे स्टीलच्या तुलनेत ६ पट जास्त मजबूत असतात. हाडे मृत कोशिका आहेत, असे अनेकांना वाटते. परंतु हाडे जोपर्यंत मनुष्याच्या शरीरात असतात तोपर्यंत जिवंत असतात. हाडांचे नस आणि रक्त वाहकांचे नेटवर्क असते. ते कॅल्शियम गोळा करू शकतात आणि यामध्ये जिवंत कोशिका असतात.

लहान मुलांमध्ये प्रौढ व्यक्तीपेक्षा जास्त हाडे असतात. एका वयस्क व्यक्तीच्या शरीरात २०६ हाडे असतात तर लहान मुलाच्या शरीरात ३०० हाडे असतात. शरीरात पायाच्या बोटाचे हाड सर्वात जास्त कमजोर असते. पायाचे बोट नेहमी किंवा कधीकधी तुटते. याच्यावर उपचार करण्याशिवाय तुमच्याकडे इतर कोणताही दुसरा पर्याय नाही.