बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री लग्नाच्या वेळी होती ‘प्रेग्नंट’, अभिनेत्यासोबत केलं होतं लग्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार कोंकणा सेन शर्माला आपण सर्वजण ओळखतो. आज कोंकणाची बॉलिवूडमध्ये वेगळी जागा आहे. कोंकणानं यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तिच्या आयुष्यात अनेक चढऊतारही आले आहेत. आज आपण तिच्या खासगी आयुष्यातील एख किस्सा जाणून घेणार आहोत. 2010 मध्ये लग्नबंधनात अडकलेली कोंकणा आपल्या लग्नाच्यावेळी प्रेग्नंट होती. लग्नाच्या 6 महिन्यांन लगेच तिनं मुलाला जन्म दिला.

कोंकणा आपला बॉयफ्रेंड रणवीर शौरी सोबत लग्न केलं होतं. आजा चल ले या सिनेमाच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. अचानक कोंकणा प्रेग्नंट राहिल्यानं दोघांनीही घाईत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नावेळी प्रेग्नंट असणाऱ्या कोंकणा आणि रणवीरनं 2010 मध्ये लग्न केलं. यानंतर 6 महिन्यांनी लगेचच कोंकणानं मुलाला जन्म दिला. 2015 मध्ये कोंकणा सेन आणि रणवीर शौरीचा घटस्फोट झाला.

कोंकणाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर कोंकणा सेनचे वडिल मुकुल शर्मा सुप्रसिद्ध पत्रकार आहेत. तिची आई अपर्णा सेन नामांकित दिग्दर्शिका आहे. कोंकणा तिच्या प्रोफेशनल लाईफइतकीच पर्सनल लाईफला घेऊनही चर्चेत राहिली आहे.

आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोंकणानं बंगाली सिनेमात लिड रोल साकारला. एक जे आछे कन्या असं या सिनेमाचं नाव आहे. यात ती निगेटीव्ह रोलमध्ये होती. या सनेमा हिट झाला. यानंतर 2002 साली कोंकणानं सुप्रसिद्ध डायरेक्टर ऋतुपर्णो घोष यांच्या तितली या सिनेमात काम केलं.

2005 साली कोंकणानं मधुर भांडारकर यांच्या पेज 3 या हिंदी सिनेमात काम केलं. या सिनेमात तिचा लिड रोल होता. हा सिनेमा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाला. कोंकणानं मिस्टर अँड मिसेस अय्यर या इंग्रजी सिनेमातही काम केलं आहे. यासाठी तिला बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा नॅशनल अवॉर्डही मिळाला आहे. खास बात अशी की, हा सिनेमा तिची आई अपर्णानं दिग्दर्शित केला होता.

Loading...
You might also like