अरे व्वा ! 90 किलोच्या सारानं ‘असं’ वजन कमी केलं

मुंबई : वृत्तसंस्था – केदारनाथ सिनेमाची अभिनेत्री सारा अली खान आज तिचा २४ वा वाढदिवस साजरा करत आहे. ती सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे. कोलंबिया युनिव्हसिटीतून तिने शिक्षण घेतल आहे. चित्रपटसृष्टीत तिने येण्यापुर्वी तिचं वजन तब्बल नव्वद किलोपेक्षाही जास्त होतं. वजन कमी करण्यासाठी तिने खुप मेहनत घेतली. फिट राहण्यासाठी सारा अली खान नियमित व्यायाम करताना दिसत आहे. साराने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “ तिला पीसीओडी त्रास आहे. दीड वर्षात तिने २० किलो वजन कमी केले. त्यासाठी नियमित आहार आणि व्यायाम सुरु ठेवला. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कथक, व्यायाम, योगासने केली. नियमित व्यायामासोबत तिने तिच्या आहारातही बदल केले. पिझ्झा, चॉकलेटसारखे फास्ट फुड बंद केले. सलाद आणि प्रथिनयुक्त आहार सुरु केला.”
सारा अली खान फिट असून ती नियमित वर्कआउट करताना दिसते. पण सुरुवातीचा काळ असा नव्हता. एक वेळ अशी होती की साराचं वजन 90 किलोंपेक्षाही जास्त होतं. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तिने स्वतःवर फार मेहनत घेतली.

सारा आता कुली नंबर वन चित्रपटाच्या रिमेकमध्ये वरुण धवन सोबत मुख्य भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच पहिल पोस्टर नुकतचं प्रदर्शित करण्यात आल. सारा यावर्षी तिचा वाढदिवस चित्रपटाच्या सेटवरच साजरा करणार असून तिने वाढदिवसाच्या दिवशीही काम करण्याला प्राधान्य दिले आहे. थायलंडमध्ये या चित्रपटाच शुटिंग सुरु आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिला वाढदिवसानंतर चित्रपटाच चित्रीकरण करण्याचा सल्ला दिला होता. पण तिने वाढदिवाच्या दिवशीही काम करणार असल्याचे सांगितले. केदारनाथ चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.
सारा लवकरच कुली नंबर 1 च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवनची मुख्य भूमिका असेल. नुकतंच या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like