श्रीनगरमध्ये हल्लेखोरांकडून अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांची गोळ्या झाडून हत्या, TV वरील डिबेटमध्ये मांडत होते काश्मीरची बाजू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये गुरुवारी सायंकाळी हल्लेखोरांनी अ‍ॅडव्होकेट बाबर कादरीवर जीवघेणा हल्ला केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर ताबडतोब बाबर कादरी यांना रुग्णालयात नेले जात होते. या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बाबर कादरी हे जम्मू-काश्मीरमध्येच नव्हे तर देशभरात एक सुप्रसिद्ध नाव होते. त्यांना बर्‍याचदा टीव्ही डिबेटमध्ये पहिले जात होते. गोळी लागल्यानंतर त्यांना लवकरच रुग्णालयात नेले जात होते, परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. बाबर कादरी यांनी आपल्या शेवटच्या एका ट्विटमध्ये त्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हंटले होते.

बाबरी कादरी यांनी आपल्या शेवटच्या ट्वीटमध्ये लिहिले की, मी राज्य पोलिस प्रशासनाला विनंती करतो की, शाह नजीरविरोधात एफआयआर दाखल करावा. जो माझ्या विरुद्ध अफवा पसरवितो की, मी एजंटसाठी मोहिम राबवितो. हे खोटे विधान माझ्या जीवाला धोका निर्माण करू शकते. कादरी यांचे ट्विटर अकाउंट बाबर कादरी ट्रुथ नावाने चालते.

यापूर्वी गुरुवारी बडगाममध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरपंचाची हत्या झाली. ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिलर (बीडीसी) चे अध्यक्ष आणि भाजपचे सरपंच भूपिंदर सिंग यांना दलवास गावात राहत्या घरी गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या घटनेच्या काही तासानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला. गुरुवारी पहाटे दहशतवाद्यांनी बांदीपोरा येथे तैनात सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार केला आणि शस्त्रास्त्र घेऊन ते फरार झाले. जखमी जवानला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे नंतर त्याचा मृत्यू झाला. दहशतवादी संघटना टीआरएफने सरपंचांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like