‘तिने’ थॅंक्स म्हणत हात पुढे करताच त्याने तिच्यासोबत केले ‘असे’ काही ; तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल

पुणे : पोलीनसामा ऑनलाईन – रस्ता चुकलेल्या तरुणीचा मोबाइल डिस्चार्ज झाला. म्हणून मित्राला आपण रस्ता चुकल्याचे सांगण्यासाठी तिने एका तरुणाकडे फोन मागितला. मित्राला फोन केल्यानंतर फोन परत केला. तिने त्याला थँक्स म्हणत शेकहँड केला. मात्र पुढे असं घडलं की तिला काही कळेना. त्या तरुणाने चक्क तिचा हात पकडून थेट तिला किस केले. त्यानंतर तो पसार झाला.

हा प्रकार कॅम्प परिसरातील अरोरा टावर्स लगतच्या फुटपाथवर मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी बालेवाडी येथे राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी मोबाईलधारक तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तरुणी कँप परिसरात मंगळवारी आली होती. परंतु ती रस्ता चुकली. बराच वेळ फिरल्यानंतर ती चुकीच्या मार्गावर फिरत होती. त्यानंतर तिचा मोबाइलही डिस्चार्ज झाला. दरम्यान तिला मित्राला फोन करून मदत घ्यायची होती. त्यामुळे ती अरोरा टॉवर लगत असलेल्या फुटपाथवर आल्यावर एका तरुणाकडे तिने मोबाईल मागितला. त्याच्या मोबाईलवरून तिने फोन केला. फोन करून झाल्यानंतर तिने मोबाईल तरुणाला परत केला आणि त्याचे आभार मानण्यासाठी थॅंक्स म्हणत हात पुढे केला. मात्र त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि तिचा किस घेतला. त्यानंतर तिला मिठीत ओढून तिच्या गालावरही किस केला. याप्रकरणी लष्कर पोलीस तपास करत आहेत.