नालासोपार्‍यात बॅगमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन –   रविवारी रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडे श्रीराम नगर येथील मुख्य रस्त्यालगत एक बॅग दिसून आली. या बॅगमध्ये ३० ते ३५ वयोगटातील महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही महिला नक्की कोण आहे, तिची हत्या कोणी केली, ही बॅग या ठिकाणी कोणी ठेवली याचा शोध तुळींज पोलिस घेत आहेत.

दरम्यान, या काळ्या बॅगमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला. ही महिला कोण आणि तिची हत्या कोणी व का केला याचा पोलिस तपास करीत आहेत. या परिसरामध्ये पोलिस अधिक तपास करत आहेत.