पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य, अश्लिल फोटो तयार करून व्हायरल करण्याची धमकी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

लग्नामध्ये ठरलेल्या १० लाख रुपये हुंड्यापेकी सात लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा वारंवार छळ करण्यात आला. तसेच पतीने पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य केले. तर दिराने अश्लील फोटो तयार करून ते सोशल मीडियावर टाकण्याची भीती दाखवल्याचा प्रकार शहरात घडला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’be7559f4-c85f-11e8-91a7-d782f30edf02′]

या प्रकरणी पीडित ३० वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. तर पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार २०११ पासून सुरु होता.

बोरघाटात बस दरीत कोसळली

पीडित तरुणीचे आरोपीशी लग्न ठरले. यावेळी लग्नात १० लाख रुपये गुंडा देण्याचे ठरले होते. मात्र लग्नाच्या वेळी तरुणीच्या वडिलांनी ३ लाख रुपये आणि १४ तोळे सोने दिले. लग्नानंतर वेळोवेळी माहेरहून हुंड्याची राहिलेली रक्कम आणावी यासाठी तिचा छळ सुरू केला. तसेच पतीने तिच्या सोबत अनैसर्गिक कृत्य केले. दिराने विवाहितेचे अश्लिल फोटो तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवली. लग्नात दिलेले १४ तोळे सोने घेऊन फसवणूक केली. तर विवाहिता आणि तिच्या ३ वर्षाच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. तपास पोलीस करत आहेत.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d4cd90d5-c85f-11e8-86c8-7de15479463e’]