Unlimited Data | 3 महिन्यांपर्यंत रोज मिळवा 5 GB सह अनलिमिटेड डेटा, जाणून घ्या कोणत्या कंपनीचा सर्वात स्वस्त प्लान

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – Unlimited Data | स्पर्धेमुळे अनेक टेलीकॉम कंपन्या एकापेक्षा एक ऑफर लोकांना देत आहेत. येथे आपण 84 दिवसांच्या एयरटेल, वोडाफोन आयडिया रिलायन्स जियो आणि बीएसएनएलच्या प्लानबाबत जाणून घेणार आहोत, जे 600 रुपयांपेक्षा सुद्धा कमीमध्ये मिळत आहेत. डेली इंटरनेट लिमिट 5 जीबीपासून अनलिमिटेड (Unlimited Data) पर्यंत आहे.

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) –

– भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) अवघ्या 599 रुपयात डेली 5 जीबी डेटाचा प्लान ऑफर करत आहे.

– या प्लान अंतर्गत 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, डेली 5 जीबी डेटा आणि रोज 100 एसएमएस मिळतात.

– याशिवाय बीएसएनएल आपल्या यूजर्सला रात्री 12 वाजेपासून सकाळी 5 वाजेदरम्यान अनलिमिटेड डेटाचा सुद्धा लाभ देते.

– हा डेटा तुमच्या डेली डेटा लिमिटमधून कापला जाणार नाही.

– पण यूजर्सला या प्लानमध्ये कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मचे फ्री सबस्क्रीपशन मिळत नाही.

रिलायन्स जिओ (Reliance Jio) –

– रिलायन्स जिओ (Reliance Jio) 599 रुपयाच्या प्लानमध्ये ग्राहकांना रोज 2 जीबी इंटरनेट डेटा

– अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग

– 100 एसएमएससह जिओ अ‍ॅप्सचा फ्री अ‍ॅक्सेस ऑफर करत आहे.

वोडाफोन-आयडिया (VI) –

– वोडाफोन-आयडिया (VI) 599 रुपयांच्या प्लानमध्ये आपल्या ग्राहकांना 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह डेली 1.5 जीबी डेटा ऑफर करत आहे.

– या प्लानमध्ये व्हीआय आपल्या ग्राहकांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएससह रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड फ्री डेटा देत आहे.

– जो डेली डेटामधून कापला जात नाही.

– तसेच वीकेंड डेटा रोलओव्हरसह व्हीआय मूव्हीज अँड टीव्ही क्लासिक अ‍ॅक्सेस-अ‍ॅपवर अमर्यादित चित्रपट, ओरिजिनल्स, लाईव्ह टीवी, बातम्या इत्यादी ऑफर देत आहे.

एयरटेल (Airtel) –

– एयरटेल (Airtel) 598 रुपयांच्या प्लानमध्ये 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह प्रतिदिन 1.5 जीबी डेटा, अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस देत आहे.

– तसेच एयरटेल प्राईम व्हिडियो मोबाइल एडिशन फ्री ट्रायल, एयरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियम,
फ्री विंक म्यूझिक आणि फास्टॅगवर 100 रुपये कॅशबॅक देत आहे.

– सोबतच कंपनी आपल्या ग्राहकांना अपोलो 24 बाय 7 चा तीन महिन्यांचे फ्रीमध्ये अ‍ॅक्सेस ऑफर करत आहे.

Web Title : Unlimited Data | get 5 gb data daily 84 days know which company plan cheapest

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and
Twitter for every update

हे देखील वाचा

Aadhaar Card मध्ये जन्म तारीख अपडेट करणे झाले आता आणखी सोपे,
केवळ फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात म्हशीने धडक दिल्याने आयटी इंजिनियरने केला थेट मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Earn Money | 2 रुपयांची ही नोट तुम्हाला रातोरात बनवू शकते लखपती,
जाणून घ्या कसे