सरकारी कार्यालयांसाठीचे नवे नियम जाहीर ! 3 फुटांचं सोशल डिस्टेन्सिंग अन् मास्क आवश्यक, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी (दि.31) लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपत असून राज्यात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा 1 जूनपासून सुरु होत आहे. लॉकडाऊनचा पाचवा टप्पा आतापर्यंतचा सर्वात मोठा टप्पा असून तीस दिवसांचा हा टप्पा असणार आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी केंद्रानं मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून राज्यांना त्याचे पालन करण्यास सांगितले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्य शासनाने आता आपल्या कर्मचाऱ्यांसाठी त्या जाहीर केल्या आहेत.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने काढलेल्या अधिकृत परिपत्राकाद्वारे चार टप्प्यात या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये 1. सरकारी कार्यालये सुरु करण्यापूर्वी त्यामध्य काय आवश्यक बदल करण्यात यावेत, 2. या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सर्वसाधारण सूचना, 3. एखाद्या सरकारी कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यास काय करायचे याबाबतच्या सूचना, 4. कार्यालयाच्या निर्जंतुकीकरण करताना कोणती खबरदारी बाळगायची याबाबत भाष्य करण्यात आले आहे.

1. सर्वसाधारण सूचना
– कर्यालयामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची दररोज थर्मल स्क्रिनिंग करणे
– हवा खेळती राहण्यासाठी कार्यालयातील सर्व खिडक्या उघड्या ठेवणे
– सर्व कर्मचाऱ्यांना तीन पदरी मास्क सपूर्ण कार्य़ालयीन वेळेत वापरावा
– कर्मचाऱ्यांनी जंतुसंसर्ग टाळण्यासाठी नाकाला, डोळ्यांना आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे
– सर्दी-खोकला झाल्यास किंवा शिंकताना-खोकताना स्वच्छ रुमालाचा वापर करावा टिश्यू वापरल्यास तो तात्काळ बंद कचऱ्याच्या डब्यात टाकावा
– दोन कर्मचाऱ्यांमध्ये कमीत कमी 3 फुटांचे अंतर असावे, गरज पडल्यास बैठक व्यवस्था बदलावी
– कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क अनिवार्य
– कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची सुविधा तसेच स्वच्छतागृहात साबण, हँडवॉशची व्यवस्था करावी.
– वारंवार वापरात येणाऱ्या वस्तू जसे लिफ्टचे बटन, टेबल, खुर्च्या व कार्यालयातील इतर उपकरणं दिवसातून तीन वेळा 2 टक्के सोडियम हयपोक्लोराइट सोल्युशनने स्वच्छ पुसून घेणे
– सर्व कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर दिवसातून दोन वेळा स्वच्छ पूसन घ्यावा. 70 टक्के अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरने याचं निर्जंतुकीकरण कराव
– कार्यालये निमितपणे धुवून घ्यावीत, त्यासाठी सफाई कामगारांनी ग्लोव्हज, रबर बूट, ट्रिपल लेअरचा मास्क वापरावा, वापरानंतर या वस्तूंची बायोमेडिकल वेस्टच्या नियमांनुसार विल्हेवाट लावावी
– या सर्व मार्गदर्शक सूचना दर्शनिय ठिकाणी लावाव्यात

2. कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सर्वसाधारण सूचना
– एकाच वाहनातून अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रवास करू नये
– ई-ऑफिसचा जास्तीत जास्त वापर करावा, फाईल्स ई-मेलद्वारे पाठवाव्यात
– कार्यालयीन बैठक प्रत्यक्ष बैठक खोलीत न घेता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करावा. कार्यालयात एकत्र बसणे, एकत्र डबा खाणे तसेच एकाच ठिकाणी जमा होणं टाळावं, यासाठी आदेश काढावेत.
– एकच काम अनेक व्यक्तींना करणे आवश्यक नसल्यास दोन ते तीन लोकांचा गट करणे, कारण जंतुसंसर्ग झाल्यास फक्त त्यांच गटाचे अलिगकरण होईल

3. अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास
– कोणत्याही कर्मचाऱ्याला 100.4 डिग्री फॅरेनहाईटपेक्षा जास्त ताप असेल, खोकला, दम लागत असेल तर तात्काळ रुग्णालयात भरती कारवं
– कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास हायरिस्क आणि लोरिस्क कॅन्टॅक्टची यादी तयार करावी
– पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याशी तीन फुटांपेक्षा कमी अंतरावर 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ जर कोणाचा संपर्क आला असल्यास त्या कर्मचाऱ्याचे हायरिस्क कॉन्टॅक्ट असे वर्गीकरण करावे
– हायरिस्क कर्मचाऱ्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करावे
– लोरिस्कच्या कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर केला असेल तर त्यांना कार्यायलायत प्रवेश द्यावा अन्यथा घरीच क्वारंटाईन करावे आणि घरून काम करण्याच्या सूचना द्याव्यात
– जर कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याचे कामाचे ठिकाण पाहून तो मजला किंवा इमारत निर्जंतुक करावी आणि कामकाज पुन्हा सुरु करावे.

4. निर्जंतुकीकरण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना
– फरशी पुसताना तीन बादल्यांचा वापर करावा. एका बादलीत पाणी आणि डिटर्जंट, दुसऱ्या बादलीत स्वच्छ पाणी आणि तिसऱ्या बादली निर्जंतुकीकरणासाठी 1 टक्का सोडियम हायपोक्लोराईटचे द्रावण असावे.
– फरशी प्रथम डिटर्जंटच्या पाण्याने स्वच्छ धुवावी
– पुसलेले कापड दुसऱ्या बादलीमधील पाण्याने स्वच्छ करून घ्यावे, त्यानंतर हे कापड तिसऱ्या बादलीतील द्रावणात बडवून पुन्हा फरशी पुसून घ्यावी
– फरशी पुसताना एकाच दिशेने आतून बाहेरील बाजू पुसण्यात यावी
– दरवाजा, खिडक्या, लिफ्ट 1 टक्का सोडियम हायपोक्लोराईटच्या द्रावणाने पुसून घ्यावे
– कॉम्प्युटर, प्रिंटर, कि-बोर्ड, माऊस, स्कॅनर इ. इलेक्ट्रॉनिक वस्तू 70 टक्के अल्कहोल असलेल्या सॅनिटायझरने पुसावेत
– कार्यालयीन स्वच्छतागृहे दिवसातून 3 वेळा स्वच्छ करावीत
– जर कार्यालयात एकाचवेळी 5 किंवा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले तर हायड्रो पॅरॉक्साईडचा वापर करून रुग्ण सापडलेल्या भागात फॉगिंग करावं. त्यानंतर 24 तासानंतर इमारतीचा वापर सुरु करावा.