Coronavirus : कोणत्या ठिकाणी ‘कोरोना’चा सर्वाधिक ‘धोका’, जाणून घ्या ‘ती’ 35 ठिकाणं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जग व्यापले आहे. जगभरात 70 लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोना विषाणाचा संसर्ग झाला आहे. तर 4 लाखाच्या वर लोकांना जीव गमवावा लागला आहे. भारतात कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आतापर्यंत देशात 2 लाख 50 हजाराहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना संक्रमित रुग्णांमध्य भारत सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे.

1 जून पासून देशात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून अनलॉक 1 सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी लोकांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. अनलॉक 1 सुरु झाल्यापासून लोक घराबाहेर पडू लागले आहेत. लोकांनी मास्क घालणे, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टेन्सिंगचं पालन करणं गरजेचं आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी लोकांनी स्वत:च स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे.

काही तज्ज्ञांच्या मते इनडोर आणि आऊटडोर जागांना लक्षात ठेऊन काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत. कोणत्या ठिकाणी कोरोनाचा सर्वाधिक धोका असू शकतो. खुल्या वातावरणात व्हायरस पसरण्याची जोखीम कमी असते. ज्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी जाणे टाळा, कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात येण्यापासून वाचा, तज्ज्ञांनी याबाबत 35 ठिकाणांची एक यादी तयार केली आहे. यामध्ये 100 टक्क्यांच्या आधारे नंबर देण्यात आले आहेत. म्हणजेच ज्याठिकाणी टक्के जास्त तिथे कोरोना धोका सर्वाधिक आहे.

1. बार – 90 टक्के, 2. म्यूजिक कन्सर्टस – 90 टक्के, 3. खेळाचे मैदान – 80 टक्के, 4. जीम – 80 टक्के, 5.चर्च – 80 टक्के, 6. एम्यूजमेंट पार्क – 80 टक्के, 7. बुफे – 80 टक्के, 8. बास्केटबॉल – 70 टक्के, 9. पब्लिक पूल्स – 70 टक्के, 10. शाळा- 70 टक्के, 11. कॅसिनो – 60 टक्के, 12. रेस्टॉरंट, इंडोर सिटींग – 60 टक्के, 13. खेळाचे मैदान – 60 टक्के, 14. हेअर सलून – 60 टक्के, 15. पंटूर बोट राईड्स – 60 टक्के, 16. थिएटर – 60 टक्के, 17 हाऊस डिनर पार्टी – 50 टक्के, 18. एअरलाइन्स – 50 टक्के, 19. मॉल – 50 टक्के, 20. समुद्र किनारे – 50 टक्के, 21. डेंटि्ट ऑफिस -50 टक्के, 22. गर्दी – 40टक्के, 23. ऑफिस – 40 टक्के, 24. डॉक्टर ऑफिस वेटिंग रुम – 40 टक्के, 25. रेस्टॉरंट बाहेर खाणे – 40 टक्के, 26. खरेदी करणे – 30 टक्के, 27. हॉटेल – 30 टक्के, 28. गोल्फिंग – 30 टक्के, 29. लायब्रेरी आणि म्युझिअम – 30 टक्के, 30. वॉकिंग आणि रनिंग – 20 टक्के, 31. तेल भरणे – 20 टक्के, 32. हॉटेल, रेस्टॉरंट पॅकिंग खाणे आणणे – 10 टक्के, 33. टेनिस खेळणे – 10 टक्के, 34. कॅम्पिंग – 30 टक्के, 35. बॉलिंग – 50 टक्के,