Unlock -4 : केंद्राच्या बैठकीत शाळा सुरु करण्याबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अशातच अनलॉक-4 लागू करण्यात आलं आहे. अनेक मॉल आणि दुकाने नियमांचा अवलंब करीत खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 1 सप्टेंबर नंतर अनलॉक-5 सुरु होत आहे. यादरम्यान मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत विचार केला जात आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार देशात अद्याप शाळा सुरु करण्यात येणार नसल्याची माहिती मिळत आहे.

नव्याने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील देखील शाळा तातडीने सुरु होणार नसल्याचे दिसत आहे. आंध्रप्रदेशसह काही राज्यातील शाळा 1 सप्टेंबर पासून सुरु करण्याचा विचार सुरु होता. केंद्राच्या गाइडलाइन्समध्ये शाळा सुरु करण्याचा अंतिम निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे. आंध्र प्रदेश सरकारने शाळा सुरु करण्याच्या बातमीवर अनेक पालकांनी विरोध केला आहे. वायएस जगनमोहन रेड्डी सरकार 5 सप्टेंबर पासून राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावावर विचार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

महाराष्ट्रात मात्र कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. राज्यात सध्या सात लाखाच्या आसपास कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत शाळा सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे पालकांच्या संघटनांकडून सध्या शाळा सुरु करण्याला विरोध केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या ऑनलाइन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात याचा त्रास होत आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची अडचण येत असल्याने विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. असे असले तरी कोरोनाच्या या काळात शाळा सुरु करण्यास पालकांचा विरोध आहे.