Unlock 4 : आजपासून 10 राज्यात खबरदारीसह उघडणार शाळा, धार्मिक-सामाजिक कार्यक्रमात जमू शकतात 100 लोक

नवी दिल्ली : कोरोना संकटात अनलॉक-4 च्या प्रक्रियेत आज अनेक बाबतीत सवलत मिळणार आहे. आजपासून सांस्कृतिक, मनोरंजन, धार्मिक, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात 100 लोकांना मास्क घालून सहभागी होण्याची परवानगी आहे. या दरम्यान सामाजिक अंतर पाळणे, थर्मल स्कॅनिंगची तरतूद आणि हँडवॉश किंव सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असेल.

ओपन एयर थिएटर सुद्धा उघडण्यास आजपासून परवानगी देण्यात येईल. तर देशाच्या 10 राज्यांमध्ये खबरदारीसह 9वी ते 12वी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळासुद्धा उघडणार आहेत.

बिहार, राजस्थान, हरियाणा, चंडीगढ, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मेघालय, नागालँड येथे आजपासून फिफ्टी-फिफ्टी शाळा उघडल्या जातील. तर यूपी, झारखंड, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगाल येथे शाळा सध्या उघडणार नाहीत.

अशा सुरू होतील शाळा
1 केवळ 50% टीचर्स आणि स्टाफसह सुरू होत आहेत शाळा
2 पालकांची लेखी परवानगी घेऊन विद्यार्थी शाळेत येतील
3 कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व उपाय असतील
4 मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य असेल
5 स्कूल गेटवर थर्मल स्क्रीनिंग होईल
6 कंटेन्मेंट झोनमध्ये नसलेल्याच शाळा उघडतील
7 कंटेन्मेंट झोनमध्ये राहाणारे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांना परवानगी असणार नाही.
8 शाळेत जाणारे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांना कंटेन्मेंट झोनमध्ये जाण्याची परवानगी नसेल.
9 ज्येष्ठ व्यक्ती, गरोदर महिला, आजारी, हाय रिस्कचे कर्मचारी यांना परिसरात येण्याची परवानगी नसेल.
10 शाळेत मुलांना पुस्तके, वही, पेन आणि पेन्सील अशा गोष्ई शेयर करता येणार नाहीत. शाळा व्यवस्थापनाला याकडे लक्ष ठेवावे लागेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like