UNLOCK 5.0 : मंगळवापरपासून संग्रहालय, आर्ट गॅलरी उघडण्याची परवानगी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून (ministry-of-culture) गुरुवारी (दि. 5) अनलॉक 5.0 अंतर्गत संग्रहालय, कला दालन आणि प्रदर्शनांना परवानगी देण्यात आली आहे. येत्या 10 नोव्हेंबर (मंगळवार) पासून काही अटींसहीत प्रदर्शन, संग्रहालय, आर्ट गॅलरी (opening-of-museums-art-galleries-and-exhibitions-from-10-november) सुरू करता येणार आहेत. यासाठी मंत्रालयाकडून ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर’ (SOP) अर्थात काही नियमही जाहीर करण्यात आले आहेत.

प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी नियम
अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात देशभरात वेगवेगळ्या पद्धतीचे प्रदर्शन भरवण्याची परवानगी दिली आहे. परंतु, यासाठी प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रिनिंग’ची सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य राहील. इथे येणा-या प्रत्येक व्यक्तीने मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. तसंच सॅनिटायझरचा वापर करावा लागेल. प्रदर्शनांच्या तिकिट विक्रीसाठी ऑनलाइन मार्गाचा अवलंब करावा लागेल. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे सर्वांसाठी अनिवार्य असणार आहे. संपूर्ण परिसर सॅनिटाईज करणे आवश्यक असेल तसंच ही प्रक्रिया दररोज पार पाडली जाईल.

मात्र, कंटेन्मेंट झोनमध्ये येणारी संग्रहालये आणि आर्ट गॅलरी उघडल्या जाणार नाहीत. कंटेन्मंट झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रदर्शन आयोजित केले जाणार नाहीत. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांत कोविड 19 ची परिस्थिती लक्षात घेऊन सुरक्षेच्या उपायांसहीत यासंबंधी निर्णय घेऊ शकतील. उल्लेखनीय म्हणजे, करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरातील सर्व संग्रहालय, कला प्रदर्शनी आणि इतर प्रदर्शने भरविण्यास बंदी होती. त्यामुळे देशभरातील संग्रहालय आणि कला प्रदर्शन क्षेत्रावर परिणाम दिसून आला होता. परंतु, आता हळू हळू परिस्थिती सामान्य होताना दिसत आहे. त्यामुळे दिशानिर्देश जारी करत या क्षेत्राला मंत्रालयाकडून दिलासा दिला आहे.