केंद्र सरकारनं Unlock 5.0 ची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली, प्रतिबंधित क्षेत्रात कडक Lockdown सुरूच राहणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारनं (Central government) अनलॉक 5.0 (Unlock 5.0) ची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे. त्यामुळं आता सध्या जी काही बंधनं आहेत तीच पुढील महिनाभर कायम राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं (Central home ministry) सांगितलं आहे की, कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळं सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. याशिवाय प्रतिबंधित क्षेत्रात कडक लॉकडाऊन (LockDown) सुरूच राहणार आहे असंही केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

सरकारनं नागरिकांना असं आवाहन केलं आहे की, त्यांनी मास्क (Mask) आणि सोशल डिस्टेन्सिंगचं (Social distancing)पालन करावं. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाग्रस्तांचा (Covid-19) आकडा कमी होत आहे. असं असलं तरीही धोका मात्र टळलेला नाही असंही सरकारनं म्हटलं आहे.

गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून भारत कोरोनाशी निकराची झुंज देत आहे. 22 मार्च पासून पहिल्यांदाच देशाचा मृत्यूदर निच्चांकी पातळीवर आला आहे. त्यामुळं आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाली आहे.