Unlock Movie Review : एखाद्याला मिळवण्यासाठी कुणी कोणत्या पातळीला जाऊ शकतं ? गेममध्ये ‘मर्डर मिस्ट्री’ ट्विस्ट !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 

सिनेमा – अनलॉक
कलाकार – हिना खान, कुशाल टंडन, अदिती आर्य, ऋषभ सिन्हा
डायरेक्टर – देबात्मा मंडल
ओटीटी चॅनल – झी 5
रेटींग – 3 स्टार

काय आहे स्टोरी ?

सुहानी (हिना खान), अमर (कुशाल टंडन) आणि रिद्धी (अदिती आर्य) चांगले मित्र आहेत. रिद्धी आणि अमर एकमेकांना लाईक करतात. परंतु सुहानीचंही अमरवर प्रेम आहे. अशात ती आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी एक गेमची मदत घेते. गावाच्या बॅकग्राऊंडवर हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. लोक याला ब्लॅक मॅजिकचं नाव देतात. सुहानीला स्वत:लाच नाही माहित की, ती कोणत्या भोवऱ्या अडकत चालली आहे. यात अनेक रोचक ट्विस्ट आहेत. थ्रिलरच्या बाजूनं पाहिलं तर बाकी थ्रिलर सिनेमांच्या मीटरवर सिनेमा खरा उतरत नाही. परंतु कॉन्सेप्टच्या बाजूनं विचार केला तर नाकारता येत नाही. सुहानीला तिचं प्रेम मिळतं की स्टोरी वेगळ्याच मार्गानं जाते हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पहावा लागेल.

काय चांगलं आहे ?

कॉन्सेप्टच्या बाजूनं विचार केला तर यात खूप नाविन्य आहे. चांगली बाब अशी कारण नसताना स्टोरी लांबलचक केलेली नाही. कालावधी कमी असल्यानं तुम्ही एकेक लेअर पाहता आणि कहाणी तुम्हाला एंगेज करते. अशी कहाणी आजच्या काळात गरजेची आहे. कारण हॅविंग फन आणि चिल करताना आपण कशा प्रकारे दलदलीत अडकडतो हे यंगस्टर्सला कळत नाही. याचा परिणाम असा होतो की, त्यांना जीवही गमवावा लागतो.

काय खटकतं ?

थ्रिलरच्या हिशोबानं स्टोरी कमकुवत आहे. ज्याप्रणाणे प्लॉट धासू होता त्याप्रणाणे याला अजून रोचक बनवलं जाऊ शकत होता.

अभिनय

हिना खान अजूनही टीव्हीचाच अभिनय करताना दिसते. तिच्यामध्ये व्हर्सटॅलिटी दिसत नाही. तिला चांगली संधी मिळत आहे तर त्या हिशोबानं अभिनयावर काम करण्याची गरज आहे. कुशालनं आतापर्यंत जे रोल केले त्यापेक्षा वेगळं देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यात त्याला यश आलं आहे. अदितीनं काही लिमिटेड सीनमध्ये चांगला अभिनय केला आहे. ऋषभसाठी तर जास्त सीन्स नव्हतेच.